13 July 2020

News Flash

भूषण कडू आणि संजय नार्वेकर यांचे सर्किट हाऊस

भूषण कडू आणि संजय नार्वेकर हे दोघे अभिनेते ‘सर्किट हाऊस’ या आगामी विनोदी नाटकाच्या माध्यमातून पहिल्यांदा रंगभूमीवर एकत्र येत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून रंगभूमीवर सादर

| October 29, 2014 06:33 am

भूषण कडू आणि संजय नार्वेकर हे दोघे अभिनेते ‘सर्किट हाऊस’ या आगामी विनोदी नाटकाच्या माध्यमातून पहिल्यांदा रंगभूमीवर एकत्र येत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून रंगभूमीवर सादर होणाऱ्या पुनरुज्जीवित विनोदी मराठी नाटकांच्या पाश्र्वभूमीवर या नाटकाचे वेगळेपण असे की ते पुनरुज्जीवित नाही. प्रवेश आणि रसिकरंजन निर्मित या नाटकाचे दिग्दर्शन विजय केंकरे यांचे आहे. गौतम जोगळेकर लिखित या नाटकात सत्ताधारी पक्षाचा एक नेता विरोधी पक्षातील एका नेत्याच्या सचिवाला घेऊन ‘सर्किट हाऊस’ मध्ये येतो. हे दोघेही येथे पोहोचतात, तेव्हा तिथे वेगळेच नाटय़ घडलेले असते. यातून सुटका करून घेण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा नेता आपल्या स्वीय सचिवाला तेथे बोलावून घेतो. पण सुटका होण्याऐवजी गुंता वाढतो आणि यातून धमाल घडते ती यात पाहायला मिळणार आहे. नाटकाचा पहिला प्रयोग २ नोव्हेंबर रोजी सादर होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2014 6:33 am

Web Title: circuit house by bhushan kadu sanjay narvekar
Next Stories
1 यशप्राप्तीसाठी घर व काम यांची सुसूत्रता आवश्यक
2 बिग बॉस फेम सना खानला अटक
3 … जेव्हा अजय देवगण प्रभुदेवाच्या तालावर नाचतो!
Just Now!
X