समाजात आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. कित्येकदा त्यावर काही करण्याऐवजी आपण निमूटपणे बघ्याची भूमिका पार पाडत असतो. समाजाच्या याच मानसिकतेवर भाष्य करणारा ‘कोड रेड’ हा नवीन शो ‘कलर्स’ वाहिनीवर नवीन वर्षांत दाखल होणार आहे.
सध्या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या कित्येक घडामोडी, गुन्हे घडताना आसपास उपस्थित लोकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. अशा परिस्थितीमध्ये उपस्थित लोकांच्या समयसूचकतेने कदाचित होणारा गुन्हा रोखू शकण्यास किंवा गुन्हेगारास योग्य शासन होण्यास मदत होऊ शकते. पण कित्येकदा लोक याकडे दुर्लक्ष करतात. या संकल्पनेवर ‘कलर्स’चा नवीन शो ‘कोड रेड’ आधारित आहे. या शोमधून समाजात घडणाऱ्या अशा प्रकारांविरुद्ध लोकांना लढण्याची, त्यांना संघटित होण्याची प्रेरणा देणाऱ्या कथांचा समावेश करण्यात येणार आहे. या शोचे सूत्रसंचालन साक्षी तन्वर करणार आहे. या शोच्या माध्यमातून मुख्यत्वे महिला आणि बालकांच्या हक्कांसाठी एकत्रित येऊन ‘प्रत्येक आयुष्य मौल्यवान असते’ हा संदेश ती देणार आहे.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Vanchit Bahujan Aghadi Changes Lok Sabha Candidates in maharashtra ahead of lok sabha 2024 Election
‘वंचित’ चा फेरबदल कोणाच्या फायद्याचा? कोणाच्या सांगण्यावरून?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…