News Flash

मीशा शफीचे ‘भाग मिल्खा भाग’द्वारे बॉलिवूड पदार्पण

राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'भाग मिल्खा भाग' चित्रपटाद्वारे पाकिस्तानी अभिनेत्री मीशा शफी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

| July 8, 2013 06:00 am


राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटाद्वारे पाकिस्तानी अभिनेत्री मीशा शफी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. गायिका मीशा शफीने आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीची सुरूवात मिरा नायर यांच्या ‘द रिलक्टंट फंन्डामेंन्टालिस्ट’ चित्रपटापासून केली असून, ‘भाग मिल्खा भाग’ या तिच्या पहिल्या हिंदी चित्रपटात ती फरहान अख्तरबरोबर दिसणार आहे. चित्रपटात मिल्खा सिंग यांची व्यक्तिरेखा फरहान साकारत असून चित्रपटातील परिझाद या त्यांच्या जवळच्या मैत्रिणीच्या व्यक्तिरेखेत मीशा दिसणार आहे.
मीशा म्हणाली, दोन्ही देशांतील लोकांची संस्कृती आणि कथांची पाळेमुळे खोलवर रूजलेली असल्याने येथील चित्रपटांशी जुळणे स्वाभाविक आहे. पाकिस्तानमध्ये बॉलिवूडला फार मोठा प्रेक्षकवर्ग असून, भारतात पाकिस्तानी संगीताचे अनेक चाहते आहेत.
(छायाचित्र मीशा शफीच्या अधिकृत फेसबुकच्या खात्यावरून)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2013 6:00 am

Web Title: coke studio singer meesha shafi debuts in bollywood with bhaag milkha bhaag
Next Stories
1 ‘मेंटल’ चित्रपटात नादिरा बब्बर करणार सलमानच्या आईची भूमिका
2 फरहान अख्तर हा माझे प्रतिरुप – मिल्खा सिंग
3 भरत जाधवच्या भेटीचे वाढते योग
Just Now!
X