कलर्स मराठीवरील ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेमध्ये प्रेमला एक कटू सत्य कळलं, ज्यामधून बाहेर पडण्यासाठी राधाने प्रेमला मदत केली. प्रेमला तो माधुरीचा मुलगा नसून त्याला दत्तक घेण्यात आले असल्याचे कळेल तेव्हा तो कशापद्धतीने व्यक्त होईल याची माधुरीला चिंता असते.
राधा याबतीत पुढाकार घेऊन माधुरीला मदत करण्याचा निर्णय घेते. यामुळेच राधा प्रेमला सत्य सांगते जे ऐकून प्रेम पूर्णपणे खचून जातो.

इतकं मोठं सत्य माझ्यापासून का लपवून ठेवले हे त्याला कळत नाही आणि तो घराबाहेर निघून जातो. हे सगळं घडत असताना राधा प्रेमचा व्यवसाय देखील सांभाळण्यात त्याची मदत करते. हे सगळं बघून प्रेमला आता कुठेतरी राधाबद्दल प्रेम वाटू लागले आहे आणि याचीच कबुली त्याने राधाला दिली. इतके दिवस मनामध्ये काय होत आहे हे तेव्हा कळाले नसले तरीदेखील आता ते काय आहे हे प्रेमला उमगले असून त्याचे राधावर मनापासून प्रेम असल्याचे त्याने राधाला सांगितले आहे.

राधा आणि प्रेमचा आता नवा प्रवास सुरु झाला आहे असे म्हणायला हरकत नाही. परंतु, प्रेमच्या या कबुलीवर राधाचे उत्तर काय असेल? राधा तिच्या मनातील भावना प्रेमला सांगेल का? की दीपिकाच्या आईला दिलेला शब्द पाळण्यासाठी ती काहीच बोलणार नाही? राधासुध्दा प्रेमाची कबुली देणार का? प्रेम- राधाचा नातं कुठल्या वळणावर येईल? या सर्व गोष्टी पाहणं रंजक असणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका राधा- प्रेमच्या संसाराचा नवा अध्याय ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेमध्ये सोम ते शनि रात्री ९.०० वाजता फक्त कलर्स मराठीवर.