News Flash

‘द कपिल शर्मा शो’ची ‘सेल्फी मौसी’ या शोमधून कमबॅक करणार

या शोतील लोकप्रिय कलाकार सिद्धार्थ सागर हादेखील काही काळ छोट्या पडद्यापासून दूर गेला होता.

सिद्धार्थ सागर

छोट्या पडद्यावरील द कपिल शर्मा शो हा रिअॅलिटी शो मोठ्या प्रमाणावर गाजला. या शोमधल्या कलाकारांनी आतापर्यंत अनेकांना हसवले आहे.मात्र मध्यंतरी या शोमधील कलाकारांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे शोची घडी विस्कटली होती. त्यातच या शोतील लोकप्रिय कलाकार सिद्धार्थ सागर हादेखील काही काळ छोट्या पडद्यापासून दूर गेला होता. मात्र आता त्याने पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा निर्णय घेतला आहे.

विनोदवीर सिद्धार्थ त्याच्या वैयक्तिक कारणामुळे काही काळ छोट्या पडद्यापासून दूर गेला होता. यातच त्याला काही शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागल्यामुळे त्याचा छोट्या पडद्यावरील वावर अचानकपणे बंद झाला होता. त्याच्या अशा अचानक गायब होण्यामुळे त्याच्या चाहत्यांनाही मोठा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. खुद्द सिद्धार्थनेच त्याच्या  कमबॅकची बातमी दिली आहे.

‘द कपिल शर्मा शो’मध्ये झळकलेला सिद्धार्थ आता ‘कॉमेडी सर्कस’ या रिअॅलिटी शोमधून कमबॅक करणार आहे, अशी माहिती त्याने पत्रकार परिषद घेत दिली. तसेच तो इतके दिवस छोट्या पडद्यापासून दूर का गेला होता या मागचं कारणही त्याने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान,सिद्धार्थ बेपत्ता झाल्यानंतर त्याची मैत्रीण सोमी सक्सेना हिने तिच्या फेसबुक पेजवरुन त्याच्या बेपत्ता झाल्याची माहिती त्याच्या चाहत्यांना दिली होती. यावेळी तिने सिद्धार्थचा फोटो शेअर करुन ही व्यक्ती गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता आहे. त्यामुळे प्लीज कोणाला ही व्यक्ती दिसल्यास त्वरीत माझ्याशी संपर्क साधा अशी पोस्ट सोमीने केली होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 4:44 pm

Web Title: comedian sidharth sagar will be back on
Next Stories
1 Sanju Movie : ‘संजू’विषयी खुद्द संजय दत्तच काय बोलतोय ऐकलं का?
2 Sanju : ‘कारागृहातील त्या दृश्याला कात्री लावा अन्यथा..’
3 राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार टाकणारे अजूनही पुरस्काराच्या प्रतीक्षेत
Just Now!
X