बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल सध्या त्याच्या आगामी कमांडो २ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘हरे कृष्णा हरे राम..’ असे बोल असणाऱ्या गाण्याला प्रदर्शनानंतर चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसते. प्रदर्शनानंतर एका दिवसातच या गाण्याला ३२ हजाराहून अधिक प्रेक्षकांनी पाहिले आहे. गाण्याच्या संगीताबद्दल बोलायचे तर २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या ‘भुल भूलैय्या’  या चित्रपटातील गाण्याच्या  मिळते जूळते आहे. असे असले तरी हे गाणे रिमेक असल्याची कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे या गाण्यावरुन नक्कल केल्याचा वादंग निर्माण होण्याची शक्यता सध्याच्या घडीला नाकारता येणार नाही.

या गाण्यामध्ये विद्युतसोबत अदा शर्मा आणि ईशा गुप्ता दिसत आहेत. प्रकाशाच्या झगमगीमध्ये विद्युतचा लूक हा लक्ष वेधून घेणारा आहे. गाण्याचा ताल आणि सूर पाहता पार्टीसारख्या कार्यक्रमामध्ये या गाण्यावर धम्माल करण्यास अगदी योग्य असे आहे. काही दिवसांपूर्वीच विद्युत जामवाल याच्या ‘कमांडो २’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कमांडो’ या चित्रटाचा सिक्वल आहे. या चित्रपटाला दिलीप घोष यांनी दिग्दर्शित केले होते. या चित्रपटातील विद्युतच्या अभिनयाला चांगली पसंती मिळाली होती. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील विद्युतला बॉलिवूडमध्ये विदयुतला मिळालेली ओळख या चित्रपटामुळेच मिळाली.

यापूर्वी विद्युत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत दिसला आहे. ‘कमांडो’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.  या चित्रपटाच्या सिक्वलला ‘कमांडो -२  द ब्लॅक मनी ट्रेल’ असे नाव देण्यात आले आहे. चित्रपटाच्या नावावरुन हा चित्रपटाची कथा काळ्या पैशाच्या भोवती फिरताना दिसणार असल्याचे स्पष्ट होते. रिलायन्स एन्टरटेंमेन्ट प्रस्तुत या चित्रपटाची चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शक देवेन भोजानी करणार आहेत. या चित्रपटामध्ये अदा शर्मा आणि ईशा गुप्ता या अभिनेत्रींसह फ्रेडी दारूवाला आणि अदिल हे कलाकार देखील दिसणार आहेत. रिलायन्स एन्टरटेंमेन्टने नुकताच ‘कमांडो २’ चित्रपटाचा ट्रेलर ट्विटरवरून शेअर केला होता. ट्रेलरमध्ये साहस दृश्ये आणि एका रफ टफ हिरोव्यतिरीक्त ईशा आणि विद्युतची केमिस्ट्रीबी पाहायला मिळाली होती. हा चित्रपट 3 मार्चला प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी भोजानी यांनी ‘साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘सुमित संभाल लेगा’ यासारख्या विनोदी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.