01 March 2021

News Flash

coronavirus : टॉयलेट पेपर सोडा आणि… रविनाचे भन्नाट ट्विट

ट्विटरद्वारे ही माहीती दिली आहे

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड पासून लांब असलेली अभिनेत्री म्हणजे रविना टंडन. रविना बॉलिवूडपासून लांब असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर एका पठाणाचा व्हिडीओ शेअर केला होता. तर आता तिने टॉयलेट पेपरची कमतरता भासत असल्याने ट्विट केले आहे.

रविनाने सध्या जगभरात करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल वक्तव्य केले आहे. ‘शेवटी. यातून स्वच्छतेचा चांगला धडा मिळातो आहे’ असे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच तिने ट्विटमध्ये पुढे जुन्या काळात वापरण्यात येणाऱ्या लोट्याची आठवण करुन दिली आहे.

काही दिवसांपूर्वी रविनाने पाकिस्तानी पठाण चीनवर चिडला असल्याची बातमी केली होती. या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ शेअर करत रवीनाने ‘पठाणाचे बोलणे खरे होते’ असे कॅप्शन केले दिले आहे. लवकरच रवीना ‘केजीएफ चॅप्टर २’ मध्ये दिसणार आहे. प्रशांत नील हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 7:25 pm

Web Title: coronavirus actress raveena tandon react on toilet paper shortage avb 95
Next Stories
1 Coronavirus: श्रीमंतांसाठी प्रत्येक दिवस रविवार झाला आणि गरीब… – आयुषमान खुराना
2 Corona Effect: वरुण धवनचं लग्न गेलं लांबणीवर
3 शशांक केतकरने घेतली डोंबिवलीत पिशवी विकणाऱ्या आजोबांची भेट
Just Now!
X