करोना व्हायरसविरोधातील युद्ध सुरू असताना जगभरातील लोक विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी स्वविलगीकरणात राहत आहेत. विलगीकरणाविषयीच एक महत्त्वपूर्ण लघुपट सोनी बीबीसी अर्थ वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. भारतात डॉ. झँडवॅन तुलेकेन आणि मानसशास्त्रज्ञ किंबर्ली विल्सन यांनी सादर केलेला हा महत्त्वाचा लघुपट आहे. ‘करोनाव्हायरसः हाऊ टू आयसोलेट युअरसेल्फ’ असं या लघुपटाचं नाव आहे. एक तासाचा लघुपट अत्यंत साधा, वन स्टेप गाइड असून त्यातून करोना व्हायरसबद्दल गरजेची असलेली सर्व माहिती दिली आहे. यात अत्यंत विश्वासार्ह टिप्स व उपयुक्‍त सल्लेही देण्यात आले आहेत.

झँडवॅन तुलेकेन हे ब्रिटनमधील जनरल मेडिकल काऊन्सिलमधील डॉक्टर आणि ख्यातनाम सादरकर्ते आहेत. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ते आघाडीच्या तज्ज्ञांना भेट देतात. करोना विषाणूविरोधातील या लढ्यात स्वविलगीकरण सर्वाधिक का महत्त्वाचे आहे ते सांगतात आणि स्वविलगीकरणाबाबत लोकांच्या खऱ्या जगातील आव्हानांची माहिती देतात. यात स्वविलगीकरण करत असताना प्रत्येकाने ज्या गोष्टींचे पालन केले पाहिजे त्यांची माहिती किंबर्ली देतात.

करोना विषाणू हा चिंतेचा विषय आहे आणि त्यातून बाहेर येण्यासाठी खूप काळ जाईल. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती स्वविलगीकरणाद्वारे त्याचा प्रसार कमी करण्यासाठी हातभार लावू शकते. याशिवाय, लोकांमध्ये गोंधळ आणि विरोधाभास निर्माण होऊ शकतो. परंतु विषाणूप्रमाणेच चुकीची माहितीही संसर्गजन्य असते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे सोनी बीबीसी अर्थकडून या काळातील सर्वांत महत्त्वाचा लघुपट ‘करोनाव्हायरसः हाऊ टू आयसोलेट युअरसेल्फ’ सादर केला जात आहे.

१३ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता सोनी बीबीसी अर्थ वाहिनीवर हा लघुपट पाहता येईल.