News Flash

करोनाची दहशत : सलमान, विराटने सोडली मुंबई

कलाकारांनी शहरापासून दूर राहणं केलं पसंत

सलमान खान, विराट कोहली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केलं. २१ दिवसांचा हा लॉकडाउन १४ एप्रिलपर्यंत सुरु असणार आहे. तर दुसरीकडे जगभऱातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढतानाचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत काही सेलिब्रिटींनी मुंबई व गर्दीपासून दूरच राहण्यास पसंत केलं आहे. लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी अभिनेता सलमान खान कुटुंबीयांना घेऊन त्याच्या पनवेल येथील फार्महाउसवर गेला. तर दुसरीकडे क्रिकेटर विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत अलिबागमध्ये राहत असल्याचं समजतंय. त्याचसोबत नागरिकांनीही सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन ते करत आहेत.

‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान खानची आई सलमा खान आणि वडील सलीम खान हे मात्र फार्महाऊसवर गेले नाहीत. ते सध्या वांद्रे येथील घरीच आहेत. सलमानसोबत त्याची बहीण अर्पिता खान, तिची मुलं गेली आहेत. सलमानचं पनवेल येथील फार्महाऊस सर्व सुविधांनी परिपूर्ण आहे. विशेष म्हणजे तिथे ताजी फळं आणि भाज्याही पिकतात. त्यामुळे कुटुंबीयांसोबत तो निवांत वेळ घालवत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

आणखी वाचा : मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावून आला हृतिक

विराट कोहली व अनुष्का शर्मानेही मुंबईपासून दूर राहणं पसंत केलं आहे. केवळ सलमान व विराटच नाही तर खलनायकी भूमिकांसाठी ओळखले जाणारे अभिनेते प्रकाश राज हेसुद्धा शहरापासून दूर एका गावात कुटुंबीयांसोबत राहत आहेत. ‘मी पहिल्यांदाच गावातलं जीवन अनुभवतोय’, असं त्यांनी सोशल मीडियावर सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 4:21 pm

Web Title: coronavirus outbreak salman khan and virat kohli left mumbai to practice social distancing ssv 92
Next Stories
1 Video : ‘वर्कआऊटचे व्हिडीओ शेअर करणं बंद करा’; कलाकारांवर वैतागली फराह
2 लॉकडाउनमध्ये रिंकू राजगुरु करते तरी काय? पाहा व्हिडीओ
3 मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावून आला हृतिक
Just Now!
X