भारतीय क्रिकेटपटू एस. श्रीशांत लवकरच चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे. नरेश पटेल यांच्या ‘वो कौन थी’ या आगामी चित्रपटात तो एका गुजराथी युवकाची भूमिका साकारणार आहे. ‘किंजल प्रॉडक्शन प्राईव्हेट लिमिटेड’च्या बॅनरखाली बनत असलेल्या या चित्रपटाची कथा हितेश राठोड यांची आहे. ते चित्रपटाचे सह-निर्मातादेखील आहेत. चित्रपटाला संगीत सिद्धार्थ श्रीवास्तव यांचे असून, संगीत रेकॉर्डिंगकरून चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. आपला मेहुणा मधु बालकृष्णाबरोबर आलेल्या श्रीशांतने मेहुण्याच्या साथीने चित्रपटातील हे गाणे गायले. एप्रिलमध्ये शुटिंगला सुरुवात होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य अतुल हे आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 16th Mar 2015 रोजी प्रकाशित
‘वो कौन थी’मध्ये क्रिकेटपटू एस. श्रीशांत, मुहूर्ताला गायले रॅप गाणे
भारतीय क्रिकेटपटू एस. श्रीशांत लवकरच चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे. नरेश पटेल यांच्या 'वो कौन थी' या आगामी चित्रपटात तो एका गुजराथी युवकाची भूमिका साकारणार आहे.

First published on: 16-03-2015 at 12:48 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricketer s sreesanth dubs song