News Flash

‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ योजनेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सोने खरेदी करणाऱ्या ठाणे शहरातील ग्राहकांसाठी ‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ या योजनेतून अनोख्या  संधी उपलब्ध होतात.

‘चिंतामणी ज्वेलर्स’ चे किरण झुंजारराव अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत यांना भेटवस्तू देताना

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची उपक्रमाला भेट

‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ योजनेच्या अंतर्गत ठाणे शहरातील ज्वेलर्स भेटीसाठी शुक्रवारी ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली शर्मिष्ठा राऊतने ग्राहकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. सोन्याच्या खरेदीवर ग्राहकांना आकर्षक बक्षिसांची पर्वणी देणाऱ्या ‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ योजनेसाठी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या योजनेच्या अंतर्गत ग्राहकांना सोने खरेदीवर आकर्षक बक्षिसे अनुभवायला मिळणार आहेत.

सोने खरेदी करणाऱ्या ठाणे शहरातील ग्राहकांसाठी ‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ या योजनेतून अनोख्या  संधी उपलब्ध होतात. ठाण्यातील काही ज्वेलर्सकडे या संधीचा लाभ ग्राहकांना घेता येईल. सोन्याच्या खरेदीवर आकर्षक बक्षिसांची लयलूट करण्यात येणार असल्याने ठाण्यातील ग्राहकांनी या योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ योजनेच्या अंतर्गत अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने यांनी ठाण्यातील वामन हरी पेठे अँड सन्स, राजवंत ज्वेलर्स, मे. पांडुरंग हरी वैद्य आणि कंपनी ज्वेलर्स, चिंतामणी ज्वेलर्स या ठिकाणी भेट दिली. महिलांसाठी ‘लोकसत्ता’ने साकारलेली ही योजना ग्राहकांसाठी निश्चितच लाभदायक आहे, असे मत अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने हिने व्यक्त केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ या योजनेला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. कलाकारांना देखील या योजनेत सहभागी करून घेत असल्याने ग्राहकांसाठी हे आकर्षण ठरते, असे मत ‘चिंतामणी ज्वेलर्स’चे किरण झुंझारराव यांनी व्यक्त केले. सोने खरेदीसाठी आल्यावर ‘लोकसत्ता’च्या ‘सुवर्णलाभ’ योजनेविषयी ग्राहकांना कुतूहल असते. ‘लोकसत्ता’च्या योजनेचा ग्राहकांना निश्चितच लाभ होत असतो, असे ‘वामन हरी पेठे अँड सन्स ज्वेलर्स’चे रिटेल सेल्स मॅनेजर श्रीकांत देसाई यांनी व्यक्त केले.

२७ ऑक्टोबरपासून सुरू झालेली ही योजना ८ नोव्हेंबपर्यंत सुरू राहणार आहे. ‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ योजनेत सहभागी असलेल्या सराफांकडून ग्राहकांनी या कालावधीत तीन हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किमतीचे सोने तसेच सोन्याचे दागिने खरेदी करायचे आहेत. खरेदी केलेल्या या दागिन्यांवर ग्राहकांना लकी कूपन दिले जाणार आहे. ग्राहकांनी हे कूपन भरून दुकानातील ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये जमा करायचे आहे. योजनेच्या शेवटच्या दिवशी योजनेत सहभागी असलेल्या दुकानांमधून सर्व कूपन जमा केले जाणार आहेत. सर्व कूपन्स एकत्र करून सोडत पद्धतीने विजेत्यांची निवड केली जाईल. विजेत्यांची नावे ‘लोकसत्ता’मधून जाहीर केली जातील. या विजेत्यांना सहल, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, ए.सी. अशी आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेसाठी नियम व अटी लागू आहेत.

प्रायोजक

‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ योजनेचे प्लॅटिनम पार्टनर लागू बंधू, गोल्ड पार्टनर्स एम. के. घारे ज्वेलर्स, श्री नेमिनाथ ज्वेलर्स, नम्रता ज्वेलर्स, सेंको ज्वेलर्स आणि वामन हरी पेठे ज्वेलर्स आहेत, तर व्ही. एम. मुसळुणकर ज्वेलर्स, मे. पांडुरंग हरी वैद्य आणि कंपनी ज्वेलर्स, एम. व्ही. पेंडुरकर ज्वेलर्स, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, सौभाग्य ज्वेलर्स, राका ज्वेलर्स, मे. पांडुरंग हरी वैद्य अ‍ॅण्ड सन्स ज्वेलर्स, चिंतामणी ज्वेलर्स आणि शुभ ज्वेल हे सिल्व्हर पार्टनर आहेत. सपोर्टेड बाय मराठा ज्वेलर्स असलेल्या या योजनेसाठी केसरी टूर्स ट्रॅव्हल पार्टनर, डीजी १ आणि राणेज् पैठणी हे गिफ्ट पार्टनर, तर भद्रकाली प्रॉडक्शन्स आणि एनडीज् फिल्म वर्ल्ड हे एंटरटेन्मेंट पार्टनर आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2018 12:02 am

Web Title: customers spontaneous response to the loksatta gold benefit scheme
Next Stories
1 ठाण्यात रस्त्यांवर दिवाळी बाजार
2 खाडीकिनारी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन
3 बालभवनातील वाचनालयाचे खासगीकरण?
Just Now!
X