05 March 2021

News Flash

दबंगकार अभिनव रोमॅंटीक चित्रपटाची निर्मिती करणार

'दबंग' चित्रपटाचा दिग्दर्शक अभिनव कश्यप एका रोमॅंटीक चित्रपटाच्या निर्मितीमध्ये व्यस्त आहे. तो सध्या रणबीर कपूरची भूमिका असलेल्या 'बेशरम'वर काम करत असून चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी देखील

| June 12, 2013 01:17 am

‘दबंग’ चित्रपटाचा दिग्दर्शक अभिनव कश्यप एका रोमॅंटीक चित्रपटाच्या निर्मितीमध्ये व्यस्त आहे. चित्रपट निर्माता अनुराग कश्यपचा भाऊ अभिनवने सलमान खान सोबत ‘दबंग’च्या सिक्वेलचे दिग्दर्शन केले होते व तो गाजला देखील. तो सध्या रणबीर कपूरची भूमिका असलेल्या ‘बेशरम’वर काम करत असून चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी देखील अभिनवने स्वत: उचलली आहे.
‘बेशरम’ व्यतिरिक्त अभिनव आणखी एका चित्रपटावर काम करत आहे.
“हा एक रोमॅंटीक-म्युझिकल ड्रामा असून, त्याचे नाव ‘क्रेझी मुंडा’ असे आहे. या चित्रपटाची कल्पना अतिशय नवीन आहे. चित्रपटाचे चित्रिकरण पंजाब आणि युरोपमध्ये होणार आहे,” असे या चित्रपटावर काम करणा-या सूत्रांनी सांगितले.
टीएनटी एंटरटेनमेंटच्या सहयोगाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. या चित्रपटाची पटकथा ‘यमला पगला दिवाना’चे पटकथालेखक जसविंदर सिंग यांनी लिहिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2013 1:17 am

Web Title: dabangg director abhinav kashyap to produce a romantic film
Next Stories
1 ‘ये जवानी है दीवानी’च्या टीव्हीवरील प्रदर्शनास बंदी
2 करीना कपूरसह बॉलिवूडच्या इतर सेलिब्रिटींची प्रियांकाच्या वडिलांच्या शोकसभेत हजेरी
3 ‘ये जवानी है दिवानी’ रणबीर आणि दिपीकाचा सर्वांत हीट चित्रपट
Just Now!
X