30 November 2020

News Flash

सोनमच्या लग्नाविषयी ‘डॅडी कूल’ अनिल कपूर म्हणतायेत…

बी- टाऊनमध्ये सध्या एकच चर्चा सुरु आहे, ती चर्चा म्हणजे अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहूजाच्या लग्नाची. सोनम कपूरच्या घराची सजावटही सुरु झाली आहे.

सोनम कपूर, अनिल कपूर

बी- टाऊनमध्ये सध्या एकच चर्चा सुरु आहे, ती चर्चा म्हणजे अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहूजाच्या लग्नाची. सोनम आणि आनंदच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या अशा लग्नाच्याच दिवसाविषयी चाहत्यांना उत्सुकता लागून राहिलेली असताना कपूर कुटुंबियांनी मात्र याविषयी मौन बाळगल्याचंच पाहायला मिळत आहे. सोनम कपूरच्या घराची सजावटही सुरु असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले खरे. पण, तरीसुद्धा सोनमचे वडील, खुद्द अनिल कपूर यांनीही आपल्या लेकीच्या लग्नाविषयी चकार शब्द बाहेर काढला नाही.

सोनमच्या लग्नाविषयी बरीच गुप्तता पाळण्यात येत असून योग्य वेळ आल्यास सर्वकाही जाहीरपणे सांगण्यात येईल असं अनिल कपूर यांनी स्पष्ट केलं. १९ व्या आयफा पुरस्कारांच्या वोटींग वीकेंडमध्ये ते बोलत होते. त्याचवेळी सोनमच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला असता त्याचं उत्तर देत अनिल म्हणाले, ‘मी आणि माझ्या कुटुंबियांनी जेव्हा जेव्हा कलाविश्वात एखाद्या गोष्टीसाठी काही पाऊल उचललं तर माध्यमांनी आमची नेहमीच साथ दिली आहे. आम्ही कुटुंबात काय घडत आहे, त्याची माहिती योग्य वेळ येताच सर्वांपर्यंत पोहोचवू. कोणतीच गोष्ट लपवली जाणार नाही. त्यामुळे आता माझ्या घराबाहेर इतकी रोषणाई आणि सजावट का करण्यात आली आहे, याविषयीची माहितीसुद्धा लवकरच सर्वांसमोर येईल.’

वाचा : जेव्हा चहा विक्रेत्याने पहिल्यांदाच आपल्या मुलांना नेलं मॅकडोनल्डमध्ये

अनिल कपूर यांनी आपल्या मुलीच्या लग्नाविषयी केलेलं हे वक्तव्य आणि एकंदर माहोल पाहता त्यांच्या घराबाहेर इतकी सजावट नेमकी का करण्यात आली आहे, हाच प्रश्न आता अनेकांच्या मनात घर करू लागला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच सोनम आणि आनंद यांची लग्नगाठ बांधली जाणार असून, सध्या कपूर कुटुंबात आनंद आणि उत्साहाचं वातावरण असल्याचं कळत आहे. त्यामुळे आता येत्या एक- दोन दिवसांमध्ये सोनमच्या घरी सनई- चौघडे वाजणार का, याकडेच अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 11:28 am

Web Title: daddy actor anil kapoor opens up about bollywood actress sonam kapoor anand ahuja wedding
Next Stories
1 …म्हणून नागराज मंजुळेंच्या चित्रपटातून बिग बींचा काढता पाय?
2 ‘त्या’ अभिनेत्रीच्या शोधात दादासाहेबांनी जिवाचं रान केलेलं, पण…
3 Photo: ‘रोडीज’ फेम रणविजय सनी लिओनीच्या जुळ्या मुलांच्या भेटीला
Just Now!
X