News Flash

फातिमाची १० हजार मुलींच्यातून ‘दंगल’मध्ये वर्णी

फतिमाने या चित्रपटात गीताची भूमिका साकारली आहे

दंगल

अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या ‘दंगल’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. गेल्या बऱ्याच काळापासून आमिरच्या चाहत्यांमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या चित्रपटात काम केलेल्या कलाकारांचे अमिरने कौतुक केले आहे. या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी तीन महिने काम सुरु होते. त्यातून फातिमा सना शेख , सन्या मल्होत्रा, सुनाही भटनागर आणि जायरा वसी याची निवड करण्यात आली.

या चित्रपटात फातिमा शेख आणि सान्या मल्होत्रा यांची निवड तब्बल १० हजार मुलींमधून करण्यात आली आहे. फातिमाने या चित्रपटात गीताची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये सुहानी ही बबिताच्या भूमिकेत दिसणार आहे. अमिर खानने देखील या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. ‘चित्रपटात वयस्कर भूमिका साकारण्यासाठी अमिरने पाच महिन्यात त्याचे वजन कमी केले. त्याच्या या प्रवासाचा व्हिडिओ चांगलाच गाजला होता. आमिरने तब्बल पाच महिने आपल्या शरीरयष्टीवर मेहनत घेतल्याचे व्हिडिओतून समोर आले होते. या चित्रपटात एका महत्त्वाकांक्षी वडिलांच्या भूमिकेतील आमिर त्याच्या मुलींना कुस्तीमधील डावपेच शिकवण्यात यशस्वी होणार का? हे जाणून घेण्यासाठी सध्या अनेकांचेच लक्ष या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेकडे लागून राहिले आहे. आमिर खान, किरण राव आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांची निर्मिती तसेच नितेश तिवारी दिग्दर्शित ‘दंगल’ हा चित्रपट येत्या २३ डिसेंबरला प्रदर्शित होईल.

आमिरच्या या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचत आहे. या चित्रपटामध्ये आभिनेता आमिर खान कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर आमिरच्या पत्नीच्या भूमिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री साक्षी तन्वर झळकणार आहे. या चित्रपटामध्ये आमिरने महावीर सिंग फोगट यांची भूमिका साकारण्यासाठी आणि वयाच्या विविध टप्प्यातील त्यांचे रुप प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूपच मेहेनत घेतल्याचे दिसतेय. नुकतेच आमिरने प्रसारमाध्यमांसाठी ‘दंगल’ चित्रपटाच्या ‘बिहाइंड द सीन्स’ची स्पेशल स्क्रिनिंग करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 11:04 pm

Web Title: dangal fatima shaikh and sanya malhotra were chosen after audition of 10000 girls
Next Stories
1 कतरिनाविषयी केलेल्या ‘या’ वक्तव्यानंतर रणवीरने मागितली रणबीरची माफी
2 ‘या’ चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय-अजय यांच्यात रंगणार ‘सामना’
3 ‘पद्मावती’सोबत व्यग्र असणाऱ्या शाहिदचे पत्नीसोबतचे गोड क्षण
Just Now!
X