बॉलिवूडमध्ये ऑनस्क्रीन पिळदार शरीर दाखवणे आता काही नवे राहिलेले नाही. सलमान खान, शाहरुख खान, ह्रतिक रोशन, वरुण धवन यांसारख्या अनेक अभिनेत्यांनी आपल्या पिळदार शरीराचे जाहिर प्रदर्शन करुन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न अनेकदा केला आहे. परंतु ऑनस्क्रीन शर्ट उतरवण्याच्या या ट्रेंडची खरी सुरुवात केली होती, ती प्रसिद्ध अभिनेता आणि पैलवान दारा सिंग यांनी. आज त्यांची ९१वी जयंती आहे. त्या निमित्ताने आपण त्यांच्या आयुष्यातील एक आवाक् करणारा किस्सा पाहाणार आहोत.

दारा सिंग बॉलिवूड सिनेसृष्टीतील आजवरच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांचे पुर्ण नाव ‘दारा सिंग रंधावा’ असे होते. त्यांचा जन्म १९२८ साली पंजाब येथे झाला होता. त्यांचे लग्न वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी झाले होते. त्यांची पत्नी बचनो कौर त्यांच्या पेक्षा वयाने मोठी होती. त्यांनी या लग्नाला विरोध केला, परंतु कुटुंबियांनी जबरदस्तीने त्यांचे लग्न लावून दिले.

Jaya Bachchan Birth Day
Jaya Bachchan: रेखा नावाचं वादळ, राज ठाकरे नावाचा झंझावात परतवणारी चतुरस्र नायिका
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..
jayant patil govinda eknath shinde
“चालणारा नट…”, गोविंदाच्या शिवसेना प्रवेशावरून जयंत पाटलांचा टोला; म्हणाले, “त्यांचा शेवटचा चित्रपट…”

पुढे वयाच्या १७ व्या वर्षी त्यांना एक मुलगा झाला. खरं तर त्यांना कुस्तीची आवड होतीच, पण त्यांनी कुटुंबाच्या पालन पोषणासाठी व्यवसायिक कुस्तीत भाग घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी तब्बल २०० किलो वजनाच्या किंग कॉन्ग या ऑस्ट्रेलियन पैलवानाला हरवले होते. त्यांनी त्याला अक्षरश: रिंगच्या बाहेर फेकून दिले होते. त्यानंतर ते खऱ्या अर्थाने प्रसिद्धी झोतात आले. या अनोख्या पराक्रमामुळे त्यांना १९६३ साली चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी जवळपास १६ चित्रपटांमध्ये काम केले होते. २००७ साली जब वी मेट हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.