News Flash

दीपवीरच्या IIFA लूकवर मीम्सचा पाऊस

हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू येईल

बॉलिवूडचा बाजीराव अभिनेता रणवीर सिंग आणि मस्तानी अभिनेत्री दीपिका पदूकोण सध्याचे बेस्ट कपल म्हणून ओळखले जातात. तसेच ही बाजीराव- मस्तानीची जोडी त्यांच्या फॅशनेबल आऊटफिटसाठी देखील लोकप्रिय आहे. पण बऱ्याच वेळा रणवीर आणि दीपिकाचे आऊटफिट चाहत्यांच्या पसंतीला उतरत नसल्याचे पाहायला मिळते.

नुकताच रणवीर आणि दीपिकाने आयफा अवॉर्ड्स २०१९ला हजेरी लावली असून रेड कार्पेटवर जलवा दाखवला आहे. दरम्यान त्या दोघांनीही परिधान केलेल्या आऊटफिटची सर्वत्र चर्चा सुरु आहे. रणवीर आणि दीपिकाचा हा ग्लॅमरस पण हटके अंदाज चाहत्यांच्या फारसा पसंतीला उतरला नसल्याचे दिसत आहे. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी दोघांनाही ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने ‘कार्टून दिसत आहेत’, ‘हा क्यूट नाही जोक आहे’ , ‘यांना कोणी तरी समजवा’ असे म्हणत दोघांनाही ट्रोल करत काही मीम्स व्हायरल झाले आहेत.

रणवीरने आयफा अवॉर्डसाठी निळसर रंगाचा आऊटफिट परिधान केला होता. या आऊटफिटवर त्याने काळ्या रंगाची काठी हातात घेतली होती. या हटके लूकमध्ये रणवीर अत्यंत हॅन्डसम अंदाजात दिसत होता. तर दुसरीकडे दीपिकाने जांभळ्या रंगाचा लॉंग गाऊन परिधान केला आहे. ती या लूकमध्ये अत्यंत ग्लॅमरस आणि सुंदर अंदाजात दिसत होती. मात्र या बाजीव- मस्तानीची नेटकऱ्यांनी चांगलीच फिरकी घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 5:26 pm

Web Title: deepika and ranveer singh iifa 2019 awards looks memes viral avb 95
Next Stories
1 …म्हणून सचिन धकाते यांनी केली वडिलांसाठी चित्रपटाची निर्मिती
2 कतरिनाची हीरोपंती, वाचवला कॅमेरामॅनचा जीव
3 Movie Review: कुटुंबातील राजकीय संघर्षाची कथा ‘प्रस्थानम’