News Flash

‘पद्मावती’मध्ये दीपिका-रणवीरदरम्यान ही अभिनेत्री निर्माण करणार दुरावा

'पद्मावती'मध्ये दीपिका नव्हे तर अदिती साकारणार रणवीरच्या पत्नीची भूमिका

रणवीर सिंग

बऱ्याच उडत्या खबरींनंतर अभिनेत्री दीपिका पदुकोण संजय लीला भन्सालींच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटात झळकणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर या चित्रपटात रणवीर सिंग झळकणार असल्याचे  स्पष्ट झाल्यामुळे  ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ यांसारख्या सुपरहीट चित्रपटांतून आपली पात्रे आणि अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी जोडी पुन्हा एकदा या चित्रपटात पुन्हा एकत्र दिसणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये दोघांच्यातील कथानक पहाण्याची उत्सुकता लागून राहिली होती. पण रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे दोघेही या चित्रपटात एकत्र दिसणार असले तरी रणवीरच्या पत्नीच्या रुपात प्रेक्षकांना दीपिका नव्हे तर नव्या अभिनेत्रीचा चेहरा पहावा लागणार आहे.

‘पद्मावती’ हा चित्रपट ऐतिहासिक काळावर आणि पात्रांवर भाष्य करणाऱ्या कथानकावर आधारित असणार आहे. पण या चित्रपटात दीपिकाही रणवीरसिंगच्या नव्हे तर शाहिद कपूरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘पद्मावती’ हा चित्रपट चित्तोरचे राजा रतन सेन यांच्या पत्नी राणी पद्मिनी यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात दीपिका पदुकोण राणी पद्मावतीची भूमिका साकारणार असून शाहिद तिच्या पतीच्या भूमिकेत दिसेल. तर रणवीर सिंग हा पद्मावतीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटात दीपिका शिवाय अदिती राव हैदरी देखील झळकणार आहे. अर्थातच अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत दिसणाऱ्या रणवीरच्या पत्नीच्या भूमिकेत ती दिसणार असल्याची चर्चा सध्या बॉलिवूड वर्तूळात रंगत आहे.

या बहुचर्चित चित्रपटामध्ये दीपिका आणि रणवीरची पडद्यावरची अदाकारी आणि या जोडीची लोकप्रियता दिसेल, असे वाटत असताना रणवीर-अदिती राव यांची अदाकारी प्रेक्षकांना पहायला मिळणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. अदिती राव रणवीरच्या पत्नीच्या भूमिकेत असली तरी, चित्रपटाची कथा रणवीर-दीपिका यांच्यातील नाते कसे रंगविणार याची दोघांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता नक्कीच वाढेल यात शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2016 9:38 pm

Web Title: deepika padukone not playing ranveer singhs wife role in padmavati
Next Stories
1 प्रेग्नेन्सीच्या अटीमुळे झाला होता प्रियांकाचा वाद
2 ‘जॉन अब्राहम WWEच्या रिंगणात सीजरोची जागा घेऊ शकतो’
3 ‘कहानी २’चा रहस्यमय ट्रेलर प्रदर्शित..
Just Now!
X