बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदूकोण सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या लॉकडाउनमध्ये ती पती रणवीर सिंगसोबत वेळ घालवताना दिसत आहे. अशातच एका मुलाखतीमध्ये दीपिकाने तिच्या आयुष्यातील एका गोष्टीचा खुलासा केला आहे.

दीपिका आणि तिची बहिण अनीषा रात्री झोपण्यापूर्वी एका अभिनेत्याच्या फोटोला किस करुन मग झोपायच्या. पण दीपिकाला आवडणारा हा अभिनेता आहे तरी कोण? आणि कोणत्या अभिनेत्याच्या फोटोला किस करुन झोपत असेल असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

 

View this post on Instagram

 

I miss you peanut !!!Cannot wait to jump on you and squish you!!! @anishapadukone #siblings

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिकाने वोग इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘मी आणि माझी बहिण अनीषा एकाच रुममध्ये झोपायचो. आम्ही बराच वेळ सोफ्यात बसून गप्पा मारायचो तसेच हाऊस हा गेम देखील खेळायचो. आम्ही रुममधील भींतींवर हॉलिवूड स्टार लियोनार्डो डीकैप्रियोचे काही फोटो लावले होते. आम्ही झोपण्याआधी त्या फोटोंना किस करायचो आणि एकमेकांनी गूडनाईट म्हणायचो’ असे तिने म्हटले आहे.

दीपिका बऱ्याचवेळा तिच्या बहिणीसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते. एका मुलाखतीमध्ये तिने, ‘मी कधीच माझ्या बहिण्याच्या बोलण्याचे वाईट वाटून घेत नाही. कारण ती खूप इमानदार आहे. तसेच मी सगळ्या गोष्टी योग्य कराव्यात असे तिला नेहमी वाटत असते’ असा खुलासा दीपिकाने केला होता.