27 February 2021

News Flash

‘असा परफॉरमन्स यापूर्वी पाहिला नाही’; अभिनेत्रीचं ‘बिकिनी शूट’ पाहून दीपिका झाली फॅन

'या अभिनेत्रीला पुरस्कार द्या'; अभिनेत्रीचा 'तो' व्हिडीओ पाहून दीपिका झाली थक्क

टीव्ही मालिकांमधील पटकथांचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे अशी चर्चा अनेकदा आपण ऐकतो. अनेकदा या मालिकांमधील संभाषणांची खिल्ली देखील उडवली जाते. त्यांच्यावरील मिम्स व्हायरल होतात. परंतु संगीतकार यशराज मुखाते याने एक पाऊल पुढे जाऊन चक्क मालिकेतीन संभाषणावर एक रॅप साँगच तयार केलं. त्याच्या या अनोख्या रॅप साँगवर बॉलिवूड सेलिब्रिटी देखील थिरकताना दिसत आहेत. अलिकडेच यशराजच्या ‘बिगीनी शूट’ या गाण्यावर अभिनेत्री तापसी पन्नू हिने डान्स व्हिडीओ शूट केला होता. या व्हिडीओवर अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने देखील कौतुकाचा वर्षाव केला आहे.

अवश्य पाहा – “भावा तूच खरा रॉकस्टार'”; कंगनाविरुद्धच्या वादात बॉलिवूडनं दिला दिलजीतला पाठिंबा

राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत दीपिकानं या व्हिडीओची प्रचंड स्तुती केली. २०२० मधील हा तिचा सर्वात आवडता परफॉरमन्स होता. असा डान्स तिने यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. २०२० मधील सर्वोत्कृष्ट परफॉरमन्ससाठी पुरस्कार देण्याची जबाबदारी दीपिकावर कोणी सोपवली तर तो पुरस्कात ती तापसीलाच देईल असं म्हणाली.

अवश्य पाहा – “याला म्हणतात आत्मसन्मान”; ते दृश्य पाहून प्रकाश राज यांनी केलं शेतकऱ्यांचं कौतुक

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

‘बिगीनी शूट’ हा डायलॉग ‘इमोशनल अत्याचार’ या रिअॅलिटी शोमधील आहे. या शोमध्ये आलेल्या एका स्पर्धकानं शोच्या होस्टसोबत संभाषण करताना उच्चारलेली वाक्य गोळा करुन यशराजने एका गाण्याची निर्मिती केली. पाहता-पाहता हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. अगदी बॉलिवूडमधील नामांकित कलाकारही या गाण्यावर थिरकताना दिसू लागले. या गाण्यावर तापसी पन्नूने देखील डान्स केला होता. तिच्या या डान्सवर दीपिकानं कौतुकाचा वर्षाव केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 12:40 pm

Web Title: deepika padukone taapsee pannu biggini shoot video mppg 94
Next Stories
1 AK vs AK: अनुराग कश्यपने फेकले अनिल कपूर यांच्या तोंडावर पाणी
2 ‘चला देशभक्तांनी देखील रस्त्यांवर या’; कंगना रणौतने ‘भारत बंद’ला केला विरोध
3 love story : …म्हणून शर्मिला टागोर यांना मंसूर अली खान यांनी दिला होता रेफ्रिजरेटर
Just Now!
X