News Flash

बाजीराव-मस्तानी पुन्हा एकदा एकत्र, ‘या’ चित्रपटात करणार स्क्रीन शेअर

दीप-वीरने तीन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं असून हा त्यांचा चौथा चित्रपट आहे.

रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र झळकलेले अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण लवकरच पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करण्यास सज्ज झाले आहेत. कबीर खान दिग्दर्शित ’83’ या चित्रपटामध्ये दीप-वीर एकत्र येणार आहेत. विशेष म्हणजे ऑफस्क्रीन पती-पत्नी असलेली ही जोडी ऑनस्क्रीनवर देखील पती-पत्नीच्या रुपात झळकणार आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, ’83’ मध्ये दीपिका कपिल देव यांच्या पत्नीची रोमी भाटिया यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंह १९८३ विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटासाठी दीपिकाला विचारणा करण्यात आली होती. त्यानंतर दीपिकानेदेखील या चित्रपटासाठी तिचा होकार कळविला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत दीप-वीरने तीन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं असून हा त्यांचा चौथा चित्रपट आहे.

लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर २५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर ’83’ हा चित्रपट आधारित आहे. ‘83 ’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळत आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क,चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

दरम्यान, दीपिका सध्या तिच्या ‘छपाक’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 11:20 am

Web Title: deepika padukone to play wife to husband ranveer singh in sports film
Next Stories
1 आयुष्मानसोबत पहिल्यांदाच काम करणार बिग बी
2 ‘दहशतवादाला धर्म नसतो’, विवेक ओबेरॉयचा कमल हासन यांना टोला
3 कॉलेज आठवणींचा कोलाज : अभ्यास सांभाळून अभिनयाचे धडे
Just Now!
X