23 November 2019

News Flash

Video: दीपिकाला आयडीसाठी सुरक्षा रक्षकाने अडवले आणि…

दीपिकाचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतील उतरला आहे

दीपिका पदुकोण

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दीपिका तिचे वडील प्रकाश पदुकोण यांच्यासह दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दीपिका तिच्या वडिलांसह बंगळूरुला जात असल्याचे म्हटले आहे.

दीपिकाचा हा व्हिडीओ मुंबई विमानतळावरील आहे. विमानतळावर प्रवेश केल्यानंतर सुरक्षा रक्षकाने दीपिकाला अडवले आणि ओळख पत्र विचारले. व्हिडीओमध्ये दीपिका विमानतळावर प्रवेश करताना दिसत आहे. तितक्यात विमानतळावरील सुरक्षा रक्षक दीपिकाला ‘मॅडम आयडी’ असा प्रश्न विचारतो. लगेच दीपिका त्या सुरक्षा रक्षकाला ‘आयडी हवा?’ असे विचारते. त्यानंतर दीपिका तिचा आयडी दाखवून विमानतळावर प्रवेश करते. दीपिकाचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतील उतरला असून चाहते दीपिकाच्या प्रेमात पडले आहेत. एक अभिनेत्री असून ही एखाद्या सामान्य प्रवाशाप्रमाणे दीपिका ओळखपत्र दाखून विमानतळ सुरक्षा रक्षकासह सहकार्य करते तिची ही बाब चाहत्यांच्या मनाला भावली आहे.

View this post on Instagram

Thy shall always obey rules 👍 #deepikapadukone

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

सध्या दीपिका तिचा आगामी चित्रपट ‘छपाक’मध्ये व्यग्र आहे. या चित्रपटामध्ये दीपिकाने अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालची भूमिका वठविली आहे. छपाक हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर दीपिका रणवीर सिंगसह ’83’ चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटात दीपिका कपिल देव यांची पत्नी ‘रोमी देव’ यांची भूमिका साकारणार आहे. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट १० एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

First Published on June 23, 2019 1:09 pm

Web Title: deepika padukone was asked for id by security guard at the airport avb 95
Just Now!
X