News Flash

Padmavati : .. असे झाले राणीसांचे फेअरवेल!

अभिनेत्री दीपिका पदुकोणने नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले.

दीपिका पदुकोण

पद्मावती, पद्मावती आणि पद्मावती.. सध्या फक्त या एकमेव चित्रपटाची चर्चा सर्वत्र आहे. चित्रपटाशी जोडलेले वाद असो वा संजय लीला भन्साळींच्या चित्रपटाची भव्यता असो ‘पद्मावती’शी जोडलेली प्रत्येक गोष्ट सध्या बातमी होतेय. १ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे काम आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहे. सुमारे साडेतीन तासांच्या ‘पद्मावती’ला कात्री लावण्याचे काम सध्या भन्साळी करत आहेत. दरम्यान, राणी पद्मिनीची मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोणने नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले.

TOP 10 NEWS वाचा : मनोरंजन विश्वातील १० ठळक घडामोडी आणि गॉसिप

‘पद्मावती’ चित्रपटात दीपिकासोबत शाहिद कपूर, रणवीर सिंग, आदिती राव हैद्री यांच्याही भूमिका आहेत. १ नोव्हेंबरला दीपिका आणि आदितीने त्यांच्या वाट्याचे चित्रीकरण पूर्ण केले. त्यानंतर चित्रपटाच्या संपूर्ण टीमने या दोघींसाठी केक आणून त्यांना ‘फेअरवेल पार्टी’ दिली. दीपिकाच्या फॅनपेजने यासंबंधीचा व्हिडिओ शेअर केला आहे. केकवर ‘फेअरवेल राणीसा’ असे लिहिलेलं दिसते. तर आदितीने स्वतः शेअर केलेल्या ट्विटमध्ये तिच्यासाठी आणण्यात आलेल्या केकवर ‘फेअरवेल मेहरुनिसा’ असे लिहलेलं दिसते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘खल्ली बल्ली’ या गाण्याचे चित्रीकरण अद्याप बाकी असून, यात रणवीर आणि जिम सार्भ दिसणार आहेत.

वाचा : अखेर धीट ट्विंकल नमली; ‘त्या’ कमेंटबद्दल मागितली माफी

दरम्यान, ‘पद्मावती’ ही भूमिका साकारण्यासाठी दीपिकाने बरीच मेहनत घेतली आहे. तिच्या देखण्या रूपात भर पाडली ती तिने घातलेले दागिने आणि पारंपरिकतेची झाक असलेल्या तिच्या वेशभूषेने. भन्साळींच्या या स्वप्नवत चित्रपटासाठी दीपिकाने जवळपास ३५ किलोंचा लेहंगा घातला होता. यासोबत असलेल्या ओढणीचे वजन चार किलो होते. त्यामुळे ऐतिहासिक पात्र साकारण्याचा भार पेलण्यासोबतच तिने वेशभूषेचा भारही चांगलाच पेलला. चित्रपटातील दीपिकाचे सौंदर्य पाहून आणि तिच्या कपड्यांचे वजन ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 10:56 am

Web Title: deepika padukone wraps up the padmavati shoot with cake
Next Stories
1 TOP 10 NEWS : मनोरंजन विश्वातील १० ठळक घडामोडी आणि गॉसिप
2 अखेर धीट ट्विंकल नमली; ‘त्या’ कमेंटबद्दल मागितली माफी
3 सुशांतच्या स्वभावामुळे ‘केदारनाथ’च्या मार्गात अडचणी
Just Now!
X