हॉलिवूडमधून दमदार पदार्पण करण्यासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण आता पूर्णपणे सज्ज झाली आहे. बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये उल्लेखनीय आणि प्रभावी भूमिका साकारत आपली छाप उमटवणारी दीपिका अलीकडे हॉलिवूडवारी करण्यात फारच व्यस्त असल्याचे पाहायला मिळते. ‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या तिच्या हॉलिवूडपटामुळे सध्या ती प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाच्या मध्यमातून हॉलीवूडमध्ये आपले नशीब आजमावू पाहणारी दीपिका सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असून तिच्या चित्रपटांबद्दलच्या प्रत्येक घटनेच्या पोस्टस् करत असतेच.
चित्रपटाच्या फर्स्ट लुकपासून ते त्याच्या लोगोपर्यंत दीपिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या विविध पोस्ट्समुळे सिनेरसिकांमध्ये या चित्रपटाबाबत फारच उत्सुकता लागून राहिली आहे. याच उत्सुकतेत भर घालत दीपिकाने तिच्या फेसबुक पेजवर चित्रीकरणादरम्यानची तिच्या आणि विन डिझेलच्या धम्माल मस्ती करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटातून सेरेना उनगेरची भूमिका साकारणाऱ्या दीपिका या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून ‘सिन्स’ सुरु असताना पडद्यामागील खेळीमेळीचे वातावरण या व्हिडिओतून पाहायला मिळत आहे. ‘ट्रिपल एक्स’ चित्रपट मालिकेतील तिसरा आणि बहुप्रतिक्षित असा हा ‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ पुढील वर्षी २० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jul 2016 रोजी प्रकाशित
विन डिझेलसोबत दीपिकाची धम्माल मस्ती..
दीपिका अलीकडे हॉलिवूडवारी करण्यात फारच व्यस्त
Written by लोकसत्ता टीम

First published on: 28-07-2016 at 14:33 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika shared behind the scenes video of %e2%80%aa%e2%80%8exxx%e2%80%ac %e2%80%8ereturn of xander cage on facebook