News Flash

‘दिल्ली मला लाहोरची आठवण करून देते’

भारतात मी पहिल्यांदाच फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला.

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान

एफडीसीआय इंडिया कूचर वीक २०१६ च्या पहिल्या दिवशी अभिनेता फवाद खान याने रॅम्प वॉक केला. हा फॅशन शो दिल्लीत सुरु आहे. मुळचा पाकिस्तानचा असलेल्या या कलाकाराने भारतात कमी वेळातचं आपला चाहता वर्ग तयार केला आहे. फवादने रॅम्प वॉक केल्यानंतर चाहत्यांनी त्याच्याभोवती गराडा घातला. प्रेक्षकांच्या या प्रेमाने फवाद भारावून गेला होता.
त्यावेळी चाहत्यांचे प्रेम पाहून फवाद म्हणाला की, भारतात मी पहिल्यांदाच फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला. हे जरा कठीण काम आहे. लोकांना मी मॉडेल असल्याचे का वाटते, याचे उत्तर मला अद्याप कळलेले नाही. पण हेच सत्य आहे की मी यापूर्वी कधीचं रॅम्प वॉक केलेला नाही. त्यामुळे एफडीसीआय इंडिया कूचर वीक २०१६ मध्ये रॅम्प वॉक करण्यापूर्वी मी थोडा घाबरलो होतो. दिल्लीला भेट देण्यासाठी फवादने त्याच्या शूटींगमधून एक दिवसाची सुट्टी घेतली होती. त्याला ब-याच काळापासून दिल्लीत राहण्याची खूप इच्छा होती. त्याबाबत फवाद म्हणाला की, मला अजून बाहेर जाऊन दिल्ली व्यवस्थित पाहण्याची संधी मिळालेली नाही. पण मी लवकरच दिल्ली फिरण्याच्या विचारात आहे. दिल्लीकडे पाहिले की ती मला बरीचशी लाहोरप्रमाणे वाटते. त्यामुळे हे शहर अधिक जवळून बघण्यासाठी  मी उत्सुक झालोय.
पाकिस्तानी अभिनेता असलेल्या फवाद खानने खुबसूरत या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात सोनम कपूरने त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने कपूर अॅण्ड सन्स या चित्रपटात समलैंगिक व्यक्तिरेखा साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2016 1:09 pm

Web Title: delhi reminds me of lahore says fawad khan
Next Stories
1 काळवीटाला सलमानने नाही, तर कोणी मारले?
2 ‘मी काही आमिर खान नाही’
3 ‘त्या’ वक्तव्याबद्दल नसिरुद्दीन यांनी मागितली माफी
Just Now!
X