‘बेबी बेबी’ या गाण्यातून नावारूपाला आलेल्या जस्टिन बिबरने वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी ग्रॅमी पुरस्कारावर नाव कोरले. सोशल मीडियावर कोट्यवधी चाहते असणाऱ्या जस्टिनने लोकप्रियतेच्या बाबतीत सुपरस्टार मडोना, रिहाना, ब्रिटनी स्पीअर्स, लेडी गागा, सेलेना गोमेज, जस्टिन टिंबरलेक यांसारख्या अनेक आघाडिच्या पॉप गायक-संगीतकारांनाही मागे टाकले आहे. जस्टिनचे चाहते केवळ पाश्चिमात्य देशांमध्येच नाही तर भारतात देखील आहेत. सध्या सोशल मीडियावर कर्नाटकमधील एका शेतकऱ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा शेतकरी शेती करताना हिंदी ऐवजी चक्क जस्टिन बिबरची गाणी गातो.

कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे राहाणाऱ्या या देसी बिगरचं नाव प्रदिप असं आहे. २६ वर्षीय प्रदिप जस्टिनचा खुप मोठा फॅन आहे. तो शेतात काम करताना जस्टिनची गाणी गुणगुणत असतो.

आश्चर्याची बाब म्हणजे प्रदिपला खुप चांगलं इंग्रजी बोलता येत नाही. परंतु तो जस्टिनची गाणी मात्र न अडखळता गातो. तसेच त्याच्या सभोवताली असणाऱ्या लोकांना देखील इंग्रजी भाषा येत नाही. त्यामुळे सुरुवातीला लोक त्याची इंग्रजी गाण्यांवरुन खिल्ली उडवायचे. परंतु हळूहळू लोकांना तो गात असलेली गाणी आवडू लागली. आणि आता तर तो देसी बिबर या टोपण नावाने लोकप्रिय झाला आहे. सध्या सोशल मीडियावर त्याने गायलेले ‘बेबी बेबी’ हे गाणे जोरदार व्हायरल होत आहे.