‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये अभिनेता अजय देवगण तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहे. अजयसोबतच ‘जय मल्हार’ या मालिकेत खंडोबाची व्यक्तिरेखा साकारत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला अभिनेता देवदत्त नागेसुद्धा झळकला आहे. ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत देवदत्तने सेटवरच्या बऱ्याच गोष्टी उलगडून सांगितल्या.

मराठी चित्रपटाचा विचार करताना भूमिकेसाठी तूच मनात होतास, असं दिग्दर्शक ओम राऊत यांनी देवदत्तला सांगितलं. तेव्हा मला खूपच भरून आलं, अशी भावना त्याने या मुलाखतीत व्यक्त केली. मात्र अजय देवगण ‘तान्हाजी’ यांची भूमिका साकारत असल्याने १३० कोटी लोकांपर्यंत तो इतिहास पोहोचणार अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

पाहा मुलाखत-

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट आज म्हणजेच १० जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.