06 December 2019

News Flash

Video: अजय देवगणमुळे ‘तान्हाजी’ १३० कोटी लोकांपर्यंत पोहोचणार- देवदत्त नागे

पाहा, देवदत्त नागेची मुलाखत..

‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेता अजय देवगण तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहे. अजयसोबतच ‘जय मल्हार’ या मालिकेत खंडोबाची व्यक्तिरेखा साकारत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला अभिनेता देवदत्त नागेसुद्धा झळकणार आहे. ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत देवदत्तने सेटवरच्या बऱ्याच गोष्टी उलगडून सांगितल्या.

मराठी चित्रपटाचा विचार करताना भूमिकेसाठी तूच मनात होतास, असं दिग्दर्शक ओम राऊत यांनी देवदत्तला सांगितलं. तेव्हा मला खूपच भरून आलं, अशी भावना त्याने या मुलाखतीत व्यक्त केली. मात्र अजय देवगण ‘तान्हाजी’ यांची भूमिका साकारत असल्याने १३० कोटी लोकांपर्यंत तो इतिहास पोहोचणार अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

पाहा मुलाखत-

‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट पुढच्या वर्षी १० जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

First Published on December 3, 2019 10:57 am

Web Title: devdatta nage on ajay devgn tanhaji the unsung warrior movie ssv 92
Just Now!
X