News Flash

धनुषच्या पहिल्या हॉलिवूड सिनेमाचे पोस्टर पाहिले का?

धनुषची काम करण्याची एक वेगळीच पद्धत आहे, त्याचं व्यक्तिमत्व फार आकर्षक आहे

अभिनेता धनुषचा बहुचर्चित हॉलिवूड सिनेमा ‘द एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर’ या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. हा धनुषचा पहिलाच हॉलिवूडपट आहे. या पोस्टरमध्ये धनुष एका हॉट एअर बलूनमध्ये पाय बाहेर काढून आरामात बसलेला दिसत आहे. त्याने पिवळ्या रंगाचे शर्ट घातले असून त्यावर निळ्या रंगाचा कोट आणि त्याच रंगाची पॅन्ट घातली आहे.

लेखक केन स्टॉक यांच्या ‘द एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर’ या पुस्तकावर या सिनेमाची कथा आधारित आहे. पुस्तकाच्या नावावरुनच सिनेमाचे नाव ठेवण्यात आले आहे. सिनेमाचे पोस्टर ‘सिने व्यापार विश्लेषक’ रमेश बाला यांनी त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर केले आहे. सिनेमाचे चित्रीकरण मुंबई (भारत), ब्रुसेल्स (बेल्जियम), रोम (इटली) आणि पॅरिस (फ्रांस) अशा जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले आहे.

‘व्हेरायटी डॉट कॉम’शी सिनेमाबद्दल बोलताना लेखक केन स्टॉक म्हणाले की, ‘या पुस्तकाला फार यश मिळाले. या पुस्तकाची आतापर्यंत ३६ देशांमध्ये विक्री झाली. या पुस्तकात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांनी मला आकर्षित केले. ही एका चोराची कथा आहे जो जादूगार असतो. तो भारतातील मुंबई शहरात लहानाचा मोठा होतो. हा एक विनोदीपट आहे.’

याच वर्षी धनुषने ‘पावर पांडी’ या सिनेमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. त्याचा ‘व्हीआयपी- २’ हा सिनेमाही याच वर्षी प्रदर्शित झाला होता. ‘व्हीआयपी- २’ मध्ये त्याच्यासोबत काजोलचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती. काजोलने या सिनेमात नकारात्मक भूमिका साकारली होती.
धनुषबद्दल बोलताना लेखक स्टॉक म्हणाले की, ‘धनुषसारख्या भारतातील लोकप्रिय अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी मिळाली ही सर्वात सुंदर गोष्ट आहे. तो उत्कृष्ट अभिनेता तर आहेच शिवाय उत्तम डान्सरही आहे. त्याची काम करण्याची एक वेगळीच पद्धत आहे. त्याचं व्यक्तिमत्व फार आकर्षक आहे.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2017 5:16 pm

Web Title: dhanush debut hollywood movie the extraordinary journey of the fakir first look poster revealed see here
Next Stories
1 #MeToo : ‘तारक मेहता…’फेम मुनमूनही लैंगिक शोषणाची बळी
2 VIDEO: अमेरिकन दूतावास बॉलिवूडच्या प्रेमात
3 ‘टायगर जिंदा है’मध्ये दिसणार कधीही न पाहिलेली रोमांचक साहसदृश्ये
Just Now!
X