News Flash

करिश्मा कपूरची ड्युप्लिकेट पाहिलीत का?

सध्या सोशल मीडियावर या तरुणीचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील तरुणी ही हुबेहुब बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरसारखी दिसत असल्यामुळे चर्चेत आहे. पण करिश्मा सारखी दिसणारी ही मुलगी आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सध्या तिचे व्हिडीओ आणि फोटो चर्चेत आहेत.

करिश्मा कपूर सारखी दिसणाऱ्या मुलीचे नाव हिना खान आहे. ती एक टिकटॉक स्टार असून पाकिस्तानमध्ये राहते. तिचे इन्स्टाग्रामवर लाखो चाहते आहेत. ती सतत करिश्मा कपूरच्या गाण्यांवर व्हिडीओ तयार करुन शेअर करताना दिसते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Heenaakh1 (@heenaakh1)

हिनाचे हे व्हिडीओपाहून अनेक चाहत्यांनी व्हिडीओवर कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने तर ‘कुद्रत का करिश्मा’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने तिचा हा व्हिडीओ करिश्माला टॅग करत ‘ही तर सेम तुझ्यासारखी दिसते… कार्बन कॉपी’ असे म्हटले आहे. तसेच एका चाहत्याने, ‘पाहून मला धक्काच बसला.. करिश्मा ही तर तुझी खरी बहिण वाटते’ असे म्हटले आहे.

आतापर्यंत आपण ऐश्वर्या राय बच्चन, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांच्या सारखे दिसणारे व्यक्ती पाहिले होते. आता करिश्मा सारखी दिसणारी तरुणीही समोर आली असून चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 11:42 am

Web Title: did you see karisma kapoors doppelganger avb 95
Next Stories
1 ‘तारक मेहता…’मधील अभिनेत्रीला पतीने दिली BMW बाइक गिफ्ट
2 बिकनी फोटोवरून ट्रोल करणाऱ्याची कृष्णा श्रॉफने केली बोलती बंद, म्हणाली…
3 “शक्तिमान घायल!”, मुकेश खन्ना यांनी सांगितला ‘तो’ भयानक अनुभव
Just Now!
X