News Flash

Dil Bechara Trailer : सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

येत्या २४ जुलै रोजी हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘दिल बेचारा’ असं या चित्रपटाचं नाव असून यामध्ये सुशांतसोबत संजना सांघीची मुख्य भूमिका आहे. मुख्य भूमिका असलेला हा तिचा पहिलाच चित्रपट आहे. १४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र लॉकडाउनमुळे निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये सुशांतने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

किझी आणि मॅनी या दोघांची ही प्रेमकहाणी आहे. किझी कॅन्सरग्रस्त आहे आणि मॅनीचं तिच्यावर खूप प्रेम आहे. मात्र ही सामान्य प्रेमकहाणी नाही. यात बरेच ट्विस्ट आहेत. संजनाचा हा पहिलाच चित्रपट असला तरी ट्रेलरमध्ये तिच्या दमदार अभिनयाची छाप पाहायला मिळते. “जन्म आणि मरण आपल्या हातात नाही पण कसं जगायचं हे आपल्या हातात आहे”, हा सुशांतचा संवाद मनाला भिडतो.

ए. आर. रेहमान यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. सोशल मीडियावर या ट्रेलर खूप चर्चेत आहे. येत्या २४ जुलै रोजी हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जॉन ग्रीन यांच्या ‘द फॉल्ट इन अव्हर स्टार्स’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाची कथा आहे. यामध्ये सैफ अली खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. मुकेश छाबडाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 4:34 pm

Web Title: dil bechara trailer released sushant singh rajput last movie with sanjana sanghi ssv 92
Next Stories
1 झीटॉकीज घेऊन येत आहे खास १० चित्रपट
2 यशस्वी भव:! लता मंगेशकरांनी ‘या’ अज्ञात गायिकेला दिला आशीर्वाद
3 ‘राहुल गांधी परीक्षेतही कॉपी करुन पास झाले ‘; अशोक पंडितांचे टीकास्त्र
Just Now!
X