जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला करोनाची लागण झालीय. छोटा राजन तिहार कारागृहात हाय सेक्युरिटी जेलमध्ये कैद होता. इथेच त्याला करोनाची लागण झाली. त्यानंतर जेलमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.  प्रकृती अधिक खालावल्याने एमस् रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र यानंतर छोटा राजनचं निधन झालं असल्याच्या अफवा उडाल्या. या अफवांनंतर बॉलिवूडमधूल कॉन्ट्रोवर्सी किंग राम गोपाल वर्मा यांनी ट्विटरवर अशा काही प्रतिक्रिया दिल्या ज्यामुळे त्यांना आता चांगलंच ट्रोल केलं जातंय.

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी छोटा राजनबद्दल असे काही ट्विट केले आहेत ज्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर निशाणा साधण्यास सुरूवात केलीय. छोटा राजनचा मृत्यू झाल्याची अफवा उडताच राम गोपाल वर्मी यांना भावना व्यक्त करण्याचा मोह आवरला नाही. लागलीच त्यांनी पहिलं ट्विट केलं. यात ते म्हणाले, ” करोनाने छोटा राजनचा जीव घेतला. तो दुसऱ्या क्रमांकाचा डॉन आहे याचीदेखील त्याने पर्वा केली नाही. डी कंपनीचा माणूस. मला आश्चर्य वाटतंय त्याने (छोटा राजन) करोनाला शूट कसं केलं नाही? मी खरंच विचार करतोय दाऊदला कसं वाटलं असेल?” या आशयाचं ट्विट राम गोपाल वर्मा यांनी केलं होतं.

Ramgopal Verma Tweet
(photo-twitter@ram gopal varama)

मात्र छोटा राजनचा मृत्यू ही केवळ अफवा असल्याचं एमस् रुग्णालयाकडून जाहीर करण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरू असल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आणि यानंतर राम गोपाल वर्मा यांनी आणखी एक ट्विट केलं. ते म्हणाले, ” एकंदर छोटा राजनचा मृत्यू ही केवळ अफवा होती. कोव्हिडने नव्हे तर अफवा पसरवणाऱ्यांनी त्याला मारलं. तो अजून रुग्णालयात आहे. आशा आहे त्याला ऑक्सिजन आणि बेड मिळेल.” राम गोपाल वर्मा यांचं हे दुसरं ट्विट पाहताच नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे.

(photo-twitter@ram gopal varama)

एका युजरने रिप्लाय देत म्हंटलं आहे, “रुग्णालयातून तुम्ही छोटा राजनचं अपहरण करून त्याला तुमच्याकडे चांगले उपचार का देत नाहित. तुमच्या अंडरवर्ल्ड सिनेमांसाठी तो तुमची मदत करायचा.” अशा आशयाची कमेंट युजरने केलीय.

तर दुसरा युजर म्हणालाय, “छोटा राजनच्या शेजारीच तुमचा बेडही लावून घ्या.”

आणखी एक युजर म्हणालाय की छोटा राजनबद्दल तुम्ही चांगलेच सक्रिय आहात. राम गोपाल वर्मा यांना एकंदरच हे दोन्ही ट्विट चांगलेच महागात पडले आहेत. वादग्रस्त वक्तव्य करून वादात सापडण्याची राम गोपाल वर्मा यांची ही काही पहिली वेळ नाही. या आधी अनेक वादग्रस्त व्यक्तव्य केल्याने त्यांना ट्रोल व्हावं लागलं होतं.

काही दिवसांपूर्वीच राम गोपाल वर्मा यांनी देशातील ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. ““ते (मोदी) अक्षरशः हिमालयात डोंगरांभोवती फिरणारे बाबा वाटतायत ज्यांना देशातील ऑक्सिजन, बेड्सच्या समस्येबद्दल काहीच कल्पना नाहीय, अशा दिसणाऱ्या पंतप्रधानांची मला प्रामाणिकपणे लाज वाटत आहे. तर सर कमीत कमी दाढी तरी करा,” अशा शब्दात राम गोपाल वर्मांनी टीका केली होती.