News Flash

‘अर्णब गोस्वामीसमोर दाऊद म्हणजे लहान मुलगाच’; राम गोपाल वर्मांनी केली टीका

राम गोपाल वर्मांनी व्यक्त केली खदखद

‘अर्णब गोस्वामीसमोर दाऊद म्हणजे लहान मुलगाच’; राम गोपाल वर्मांनी केली टीका

‘अर्णब गोस्वामीसमोर कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम लहान मुलगा आहे का?’, असा सवाल चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी विचारला आहे. राम गोपाल वर्मा यांनी ट्विट करत रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अर्णब गोस्वामी सतत चर्चेत असून सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी त्यांनी अनेक दावे केले आहेत. त्यामुळेच अनेकांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. त्यातच आता राम गोपाल वर्मा यांनीदेखील त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.

“मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माझा एक प्रश्न आहे. आपल्या समाजाला नुकसान पोहचवणारा यापेक्षा मोठा माफिया कोणी असू शकतो का ?अर्णब गोस्वामी समोर दाऊद इब्राहिम म्हणजे लहान मुलगाच आहे”, असं ट्विट राम गोपाल वर्मा यांनी केलं आहे.


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अर्णब गोस्वामी यांनी सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अनेक दावे केले आहेत. इतकंच नाही तर बऱ्याच वेळा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा एकेरी उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे सध्या अनेक स्तरांमधून त्यांच्यावर टीकास्त्र डागण्यात येत असल्याचं पाहायला मिळतं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2020 1:45 pm

Web Title: director ram gopal varma said that dawood ibrahim is a baby compared to arnab goswami ssj 93
Next Stories
1 कर्करोगावर प्रबोधनात्मक लघुपट ‘आरसा’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित
2 विजय तेंडुलकरांच्या ‘झाला अनंत हनुमंत’ नाटकावर चित्रपट
3 स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगितिक मैफीलीचं आयोजन
Just Now!
X