News Flash

दिशा पटानीचा हॉट लूकमधील फोटो पाहिला का?

फोटोमध्ये दिलेल्या मादक अदांनी तिचे चाहते घायाळ झाले नसतील तर नवलच

दिशा पटानी

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी इन्स्टाग्रामवर फार सक्रीय असते. गुरूवारी १५ जूनला तिने आपला एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला. दिशाने या फोटोमध्ये दिलेल्या मादक अदांनी तिचे चाहते घायाळ झाले नसतील तर नवलच. दिशाने हा फोटो शेअर करताच अगदी थोड्याच वेळात या फोटोला लाखांच्यावरती लाइक्स आले.

मी सईला पहाटे ३ वाजताही उठवतो- सागर कारंडे

२०१५ मध्ये आलेल्या कॅडबरीच्या जाहिरातीमध्ये दिशा पहिल्यांदा दिसली होती. त्यानंतर २०१६ मध्ये ‘लोफर’ या तेलगू सिनेमातून तिने सिनेसृष्टीत प्रवेश केला. तिने आतापर्यंत एकूण चार सिनेमांत काम केले आहे. त्यातला ‘एमएस धोनी अनटोल्ड स्टोरी’ हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. तिने जॅकी चॅनसोबत ‘कुंग फू योगा’ या आंतरराष्ट्रीय सिनेमातही काम केलं आहे. याशिवाय तिचं नाव टायगर श्रॉफसोबतही अनेकदा जोडलं जातं. पण तिने याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. एवढेच काय तर टायगरनेही ते दोघं फक्त जवळचे मित्र असल्याचे वारंवार सांगितले आहे.

दिशाने नुकताच तिचा २५ वा वाढदिवस साजरा केला. हा वाढदिवस तिने टायगरसोबत साजरा केला होता. नुकतेच टायगर आणि दिशा शॉपिंगला गेले होते. यावेळी दिशा शॉपिंग करून आली तर टायगर तिची गाडीत वाट बघत होता. लवकरच दिशा पुन्हा एकदा सुशांत सिंग राजपूतसोबत ‘रॉ’ या सिनेमात काम करणार असे म्हटले जाते. टायगरही लवकरच ‘मुन्ना मायकल’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नृत्यकौशल्य आणि भारदस्त शरीरयष्टीमुळे बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण करणारा टायगर या सिनेमात ‘डान्स’ आणि ‘अॅक्शन’ची उत्तम सांगड घालताना दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 4:19 pm

Web Title: disha patanis throwback bikini photo is everything thats hot see photo
Next Stories
1 परेश रावलसह सर्व भारतीय गोमूत्र पिणारे, पाकिस्तानी समर्थकाची टिवटिव
2 आपल्या मुलांनी हे आयुष्य जगावं असं कोणालाच वाटणार नाही- सैफ अली खान
3 कतरिनाचा अॅक्शन अवतार
Just Now!
X