News Flash

‘डॉक्टर डॉन’च्या सेटवर लकी अली यांच्या गाण्यांची मैफिल

पाहा व्हिडीओ..

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय गायक म्हणून लकी अली हे ओळखले जातात. त्यांची ९०च्या दशकातील गाणी प्रचंड गाजली होती. सध्या लकी अली यांचे अनप्लग गाण्यांचे व्हिडीओज देखील व्हायरल होत आहेत. अशातच अभिनेता देवदत्त नागेने मालिकेचा सेटवर लकी अली यांचे गाणे गिटारवर वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

झी युवावरील प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम ‘डॉक्टर डॉन’ सगळ्यांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेच्या सेटवर कलाकार ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन देखील खूप धमाल करत असतात. नुकतंच या मालिकेच्या सेटवरील बिहाइंड द सिन व्हिडीओ देवदत्तने शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Devdatta G Nage (@devdatta.g.nage)

या व्हिडीओमध्ये देवदत्त गिटारवर लकी अली यांचं गाणं वाजवतोय आणि सर्व कलाकारांची मैफिल जमली आहे. बाकीचे कलाकार त्याच्या गाण्याला साथ देत आहेत तर देवा गिटार वाजवून माहोल बनवतोय. उत्तम अभिनय कौशल्यासोबत देवदत्त म्युजिकमध्ये देखील निपुण आहे. तो अनेक वाद्य वाजवू शकतो. डॉक्टर डॉनच्या सेटवर जमलेल्या या मैफिलीचा प्रेक्षक आणि चाहते देखील पुरेपूर आस्वाद घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2020 2:05 pm

Web Title: doctor don serial behind he scene video avb 95
Next Stories
1 “आंदोलनामुळे ७० हजार कोटींचं नुकसान होतंय”; कंगनाने केली शेतकऱ्यांवर टीका
2 तब्बल १० वर्ष डेट केल्यानंतर ‘ही’ लोकप्रिय जोडी झाली विभक्त; अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट
3 शुभंकर तावडे दिसणार वेगळ्या अंदाजात
Just Now!
X