News Flash

डॉक्टर डॉन मालिकेला मिळणार नवं वळण…

जाणून नेमकं काय होणार...

‘डॉक्टर डॉन’ ही मालिका अत्यंत कमी कालावधीमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. देवदत्त नागे आणि श्वेता शिंदे यांची जोडी पहिल्यांदाच या मालिकेच्या निमित्ताने आपल्याला एकत्र पाहायला मिळत आहे. सध्या मोगराच्या रुपाने देवा आणि मोनिका यांच्यातल्या प्रेमपुर्ण संबंधामध्ये एक नवे वळण आलेलं प्रेक्षक पाहत आहेत. आता यात आणखी एका ट्विस्टची भर पडणार आणि यावेळी याचे निमित्त ठरणारे देवाची मुलगी राधा.

राधा देवाची एकुलती एक मुलगी आहे. देवाचा तिच्यावर जीव आहे पण राधाला जेव्हापासून देवाच्या कामाबद्दल कळलंय ती त्याच्यापासून कायमची दूर जाऊ लागलीये जे देवासाठी असह्य आहे. म्हणूनच राधाच्या सतत जवळ रहता यावं यासाठी देवाने तिचं कॉलेज जॉईन केलं आणि यातच तो मोनिका या कॉलेज डिनच्या प्रेमात पडू लागतो. मोनिकाचे प्रेम जिंकण्यासाठी देवा हवे ते प्रयत्न करतोय. यात तो त्याचा मूळ उद्देश म्हणजे राधाला विसरु लागलाय ज्यामुळे राधा मात्र अधिकच नाराज झाली आहे. ती देवा आणि डॉ मोनिकाच्या प्रेमात अडसर बनू पहातेय.

राधाचा वाढदिवस येतो तेव्हा कबीर तिला सरप्राईज देण्यासाठी एक मस्त प्लॅन बनवतो. तो तिला तिच्या आईचं पत्र गिफ्ट म्हणून देतो. राधा जेव्हा ते पत्र वाचते तेव्हा तिला कळतं ते तिच्या आईचं नाही तिच्या वडिलांनी लिहीलेलं पत्र आहे. राधा यामुळे अधिकच दुखावते आणि कबीरला तिच्या वडिलांचे सत्य सांगते. जे ऐकून रागाने बिथरलेला कबीर देवासमोर येतो आणि राधाला दु:खं दिल्याबद्दल तिच्या वडिलांना आपण कधीच माफ करणार नाही अशी शपथ घेतो. कबीरच्या या शपथेवर देवाची काय प्रतिक्रीया असणार? आणि राधा व कबीर देवा आणि मोनिका यांचे आयुष्य आता कुठच्या वळणावर येणार? हे पाहणे अधिक उत्सुकतेचे असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2020 6:17 pm

Web Title: doctor don serial on new mode avb 95
Next Stories
1 अभिनेत्याच्या वाढिवसाचं होर्डिंग लावताना तीन चाहत्यांचा मृत्यू
2 ‘वंदे गणपती’ ला प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद पाहून सावनी रविंद्र म्हणते…
3 ‘एक खराब फळ…’, रविनाचे कंगनाला सडेतोड उत्तर
Just Now!
X