21 January 2019

News Flash

..म्हणून करणची मुलं कोणत्याच चित्रपटाच्या सेटवर दिसणार नाहीत

आपल्या मुलांबद्दलच्या काही गोष्टी यावेळी करणने अगदी मोकळेपणाने सांगितल्या.

करण जोहर, त्याची जुळी मुलं यश आणि रुही

सध्याच्या घडीला सेलिब्रिटींपेक्षा त्यांची मुलंच अधिक चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. छायाचित्रकारही सेलिब्रिटी किड्सची प्रत्येक झलक कॅमेऱ्यात कैद करत असतात. अशाच प्रसिद्ध सेलिब्रिटी किड्समध्ये निर्माता, दिग्दर्शक करण जोहरच्या यश आणि रुही या जुळ्या मुलांचाही समावेश आहे. सरोगसी मदतीने जन्माला आलेली ही जुळी मुलं अनेकांचे लक्ष वेधत आहेत. आधी करणने आपल्या मुलांना प्रसार माध्यमांपासून दूर ठेवणेच योग्य समजले होते. मात्र, गेल्या दोन-तीन महिन्यात त्याच्या मुलांची झलक अनेकदा पाहावयास मिळाली. कधी कोणाच्या बर्थडे पार्टीत तर कधी ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये यश – रुही त्यांच्या वडिलांसोबत झळकले. आता ही मुलं करणच्या चित्रपटांच्या सेटवरही दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. पण, खरंतर असं काहीही होणार नाही. यामागचे कारण खुद्द करणनेच स्पष्ट केले.

वाचा : जाणून घ्या, अभिषेक-ऐश्वर्याच्या मुंबईतील महागड्या अपार्टमेण्टबद्दल..

यश आणि रुही मनोरंजनाचा वारसा असलेल्या कुटुंबातून आहेत त्यामुळे त्यांना नेहमी चित्रपटांच्या सेटवर जाण्याची सवय असेल, असे अनेकांना वाटत असावे असे घराणेशाहीचा आरोप असलेला करण जोहर म्हणाला. पण, तसे काहीही होणार नसल्याचे त्याने पुढे स्पष्ट केले. एका मुलाखतीत करण म्हणाला की, कामाच्या ठिकाणी मुलांना घेऊन जाण्याच्या मी विरोधात आहे. मुलांचा बाबा दिग्दर्शक, निर्माता आहे म्हणून त्यांनीही सेटवर जायला हवे असे काही नाही. मला तरी तशी गरज वाटत नाही. भविष्यातही मी माझ्या मुलांवर कोणताही दबाव टाकणार नाही. कारण त्यांचं बालपण चित्रपटाच्या सेटवर जावं असं मला मुळीच वाटत नाही.

वाचा : लग्न न करताच बाबा हो, राणी मुखर्जीचा सलमानला सल्ला

आपल्या मुलांबद्दलच्या काही गोष्टी यावेळी करणने अगदी मोकळेपणाने सांगितल्या. रुही ही आनंदी स्वभावाची आहे. तिच्यात संगिताचीही आवड निर्माण होतेय. याविषयी सांगताना तो म्हणाला की, मी जेव्हा कधी एखादे गाणे लावतो तेव्हा तिच्या चेहऱ्यावर सुंदर हसू उमटते. त्या गाण्याला ती प्रतिसादही देते. त्यामुळे दिवसभर आमच्या घरात गाणी सुरु असतात. आपल्या मुलांचा विचार करूनच घरातील सर्व गोष्टी आणि कामांचे वेळापत्रक ठरवण्यात येत असल्याचेही करणने सांगितले.

First Published on January 8, 2018 11:21 am

Web Title: dont want yash roohi to grow up on film sets karan johar