News Flash

वेगळ्या लूकमुळे ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याला ओळखणं ही झालं कठिण

त्याचा हा फोटो सध्या चर्चेत आहे.

अनेक कलाकार सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. नुकताच अतिशय लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्याने त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमधील वेगळ्या लूकमुळे अभिनेत्याला ओळखणे देखील कठीण आहे.

हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून सुबोध भावे आहे. त्याने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो ब्राह्मणाच्या वेशात दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने मास्क आणि वर्कमोड ऑन असे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

Mask and Work mode “ON” Captured by a dear friend @girijaoakgodbole

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

सुबोध लवकरच एका मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे नाव ‘शुभमंगल ऑनलाइन’ असे आहे. ‘कान्हाज मॅजिक’ या निर्मिती संस्थेद्वारे सुबोधची ही मालिका लवकरच कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये सायली संजीव आणि सुयश टिळक अशी नवीन जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 6:37 pm

Web Title: due face mask it became difficult recognize actor subodh bhave avb 95
Next Stories
1 ‘अप्रतिम..’, सुमीत राघवनने शेअर केला बालसुब्रमण्यम यांनी गायलेल्या मराठी गाण्याचा व्हिडीओ
2 विनीत भोंडेने खरेदी केली कार; पाहा फोटो
3 ड्रग्ज प्रकरणी चौकशीतील प्रत्येक मिनिटाची अपडेट बाहेर कशी येते? काँग्रेस नेत्याचा सवाल
Just Now!
X