01 October 2020

News Flash

‘शेप ऑफ यू’चे वेड

या गाण्याने इंटरनेटवर सध्या धुमाकूळ घातला आहे.

ग्रॅमी पुरस्कार विजेता एड शीरनच्या ‘शेप ऑफ यू’ या गाण्याने इंटरनेटवर सध्या धुमाकूळ घातला आहे. इंटरनेटवरून जगभर पसरलेल्या या गाण्याने भारतात आजवर सर्वात जास्त पाहिला गेलेला युटय़ूब व्हिडीओ म्हणून एक नवीन विक्रम नोंदवला आहे. ३० जानेवारीला प्रदर्शित झालेले हे गाणे ‘युटय़ूब इंडिया’च्या ‘मिड इअर टॉप १० सेलिंग सॉंग’ या यादीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झालेल्या या गाण्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात जास्त पाहिल्या गेलेल्या चित्रफितींच्या यादीत १६वा क्रमांक पटकावला आहे.गायक एड शीरनच्या मते त्याची ही कामगिरी स्वप्नवत असून त्याचे संपूर्ण श्रेय त्याच्या चाहत्यांना जाते. त्यांच्यामुळेच त्याला उत्तम संगीत तयार करण्याची प्रेरणा मिळते. सध्या भारतातच नव्हे तर जगभरात या गाण्याची लोकप्रियता दिसून येते आहे. अनेक गायकांनी या गाण्याला आपापल्या अंदाजात गाऊन त्याच्या अनेक आवृत्त्या तयार केल्या आहेत. भारतात तबला आवृत्ती खूप लोकप्रिय झाली असून याशिवाय बॉलीवुड, भांगडा यांसारख्या अनेक प्रकारांत गाण्याचा मनमुराद आनंद घेतला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2017 3:33 am

Web Title: ed sheeran shape of you song youtube video hollywood katta part 26
टॅग Hollywood Katta
Next Stories
1 वडिलांचा विरोधच त्याच्या यशाचा मंत्र..
2 आपटीबार
3 माधुरीवर मालिका..
Just Now!
X