News Flash

‘तानाजी’ फेम इलाक्षी गुप्ताच्या पहिल्या म्युझिक व्हिडीओचे पोस्टर प्रदर्शित

इलाक्षी लवकरच श्रेयस तळपदेसोबत 'लव्ह यु शंकर' या चित्रपटात दिसणार आहे.

elakshi gupta,
इलाक्षी लवकरच श्रेयस तळपदेसोबत 'लव्ह यु शंकर' या चित्रपटात दिसणार आहे.

बॉलीवूड चित्रपट ‘तानाजी : द अंसंग वारियर’ मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी इलाक्षी गुप्ताला लोकप्रियता मिळाली. आता डॉ. इलाक्षी गुप्ता मराठी चित्रपटसृष्टीत ‘भ्रम’ चित्रपटातून पदार्पण करणार आहे. इलाशी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. इलाशीने तिच्या सोशल मीडियावरून तिच्या आगामी चित्रपटातील गाण्याचे पोस्टर शेअर केले आहे.

इलाशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे पोस्टर शेअर केले आहे. हा तिचा एक नवीन म्युजिक व्हिडीओ आहे. या गाण्याचं नाव ‘नखरा’ आहे. हे पोस्टर चमकदार रंगांनी अतिशय आकर्षक दिसत आहे. इलाक्षीने या पोस्टरमध्ये स्पॅगेटी टॉप परिधान केले आहे. त्यासोबत मोतीची माळा परिधान केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Elakshi A Gupta (@dr_elakshi)

आणखी वाचा : VIDEO: ‘मी काय कुंद्रा आहे का?’ पाहा असं का म्हणाले राज ठाकरे

हे गाणे ३० जुलै रोजी पीबीएच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित होणार आहे, इलाक्षी आपल्या आगामी म्युसिक विडिओ बद्दल बोलताना म्हणाली, “पीबीए म्युझिकसह माझे नवीन सिंगल जाहीर केल्याने मला खरोखर आनंद झाला आहे आणि हे गाणे इतर सर्व गाण्यांपेक्षा वेगळे असेल आणि मला आशा आहे की प्रेक्षकांना माझे काम आवडेल आणि गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यासाठी आम्ही त्यात भर घातली आहे.”

आणखी वाचा : राज कुंद्रा नाही तर शिल्पा शेट्टीच्या अॅपसाठी विचारणा झाली होती, सेलिना जेटलीचा खुलासा

इलाक्षी गुप्ता ‘तानाजी : द अंसंग वारियर’ ह्या चित्रपटातून प्रकाशझोतात आली. लवकरच इलाक्षी श्रेयस तळपदे सोबत हिंदी चित्रपट ‘लव्ह यु शंकर’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण संपले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2021 5:01 pm

Web Title: elakshi gupta new music video nakhara poster released dcp 98
टॅग : Entertainment News
Next Stories
1 काश्मीरमध्ये शाळेसाठी अक्षय कुमारने दिली ‘१ कोटी’ रुपयांची देणगी
2 पतीच्या निधनानंतर मंदिरा बेदीने खास फोटो शेअर करत मुलीला दिल्या शुभेच्छा
3 वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत एकत्र, “भेटली ती पुन्हा २” चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!!
Just Now!
X