22 November 2019

News Flash

इम्रान हाश्मीने घेतली नवी कार, किंमत पाहून व्हाल थक्क

मुंबईच्या रस्त्यांवर इम्रान या कारमधून फिरताना दिसत होता

‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘मर्डर’ आणि ‘मर्डर २’ अशा विशेष चर्चिल्या गेलेल्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारलेला अभिनेता म्हणजे इम्रान हाश्मी. आता इम्रानने एक नवी लक्झरी कार स्वत:साठी विकत घेतली असल्याचे म्हटले जात आहे. मुंबईच्या रस्त्यांवर इम्रान या कारमधून फिरतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इम्रानचा हा व्हिडीओ बॉलिवूड फोटोग्राफर विरल भयानीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये इम्रानने पिवळ्या रंगाची ‘लँबॉरगिनी अव्हेंताडोर’ चलावता दिसत आहे. या कारची किंमच ५.५६ कोटी ते ६.२८ कोटींच्या आसपास असल्याच्या चर्चा सुरु आहेत. ही कार ३ सेकंदामध्ये १०० किलोमीटर प्रति तास इतका वेग पकडते. या शानदार कारमध्ये व्ही १२ हे ताकदवान इंजिन देण्यात आले आहे.

सध्या इम्रान त्याचा आगमी चित्रपट ‘चेहरे’मध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. हा चित्रपट २१ फेब्रुवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन रुमी जाफरी करणार आहे. तर निर्मिती आनंद पंडित करत आहेत.

इम्रान नेटफ्लिक्सवरील ‘किंग खान’ अर्थात शाहरुख खान निर्मित ‘बार्ड ऑफ ब्लड’ या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सिरीज येत्या २७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, ‘बार्ड ऑफ ब्लड’ ही सिरीज लेखक बिलाल सिद्धीकी यांच्या ‘बार्ड ऑफ ब्लड’ या पुस्तकावर आधारित आहे. ही सिरीज अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीजमध्ये इम्रानसोबत शोभिता धुलिपाला, कीर्ति कुल्हारी, विनीत सिंह प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

First Published on July 11, 2019 4:20 pm

Web Title: emraan hashmi buys sexy yellow lamborghini aventador car avb 95
Just Now!
X