05 July 2020

News Flash

नर्गिसला वाचवण्यासाठी सरसावला इमरान हाश्मी

एक व्यक्ती नर्गिसचे सतत फोटो काढत होता.

नर्गिस व इमरान

अझर या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी एक व्यक्ती नर्गिसचे सतत फोटो काढत होता. तसेच, व्हिडिओदेखील काढत होता. हे जेव्हा इमरानच्या लक्षात आले तेव्हा तो नर्गिस फक्रीच्या मदतीसाठी धावून गेला.
नर्गिस आणि इमरान अझरसाठी चित्रिकरण करत असताना अनेक प्रेक्षक चित्रीकरण पाहण्यासाठी जमले होते. तेव्हा एक व्यक्ती नर्गिसचे सतत फोटो आणि व्हिडिओ काढत असल्याने नर्गिस अस्वस्थ झाली. इमरानच्या ही गोष्ट लक्षात आली तेव्हा तो नर्गिसच्या मदतीस धावून गेला. यावर नर्गिस म्हणाली की, प्रेक्षक जेव्हा मोबाईलने रेकॅार्डींग करतात तेव्हा मला अस्वस्थ वाटू लागते आणि माझे कामात लक्ष नाही लागत. अशा वेळी कितीही म्हटले तरी दुर्लक्ष करता येत नाही. मी त्या वेळी सदर व्यक्तीस थांबवण्याचा प्रयत्न केला तरीही तो व्यक्ती व्हिडिओ काढत होता. मग इमरान तेथे गेला व त्याला बाजूला घेऊन समज दिली. मला माहीत नाही इमरान त्याला काय बोलला पण लगेत तो तेथून निघून गेला. इमरानला या घटनेबद्दल विचारले असता तो म्हणाला , प्रेक्षकांचे आमच्यावर असलेल्या प्रेमाची मी कदर करतो. पण कोणीही आपली मर्यादा ओलांडू नये. अन्यथा आम्हाला त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल .
इमरान हाश्मी मोहम्मद अझरूद्दीनच्या भूमिकेत तर नर्गिस फाखरी संगीता बिजलानी म्हणजेच अझरुद्दीन दुसऱ्या पत्नीच्या भूमिकेत दिसेल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2016 1:11 pm

Web Title: emraan hashmi comes to nargis fakhris rescue on the sets of azhar
टॅग Emraan Hashmi
Next Stories
1 ७० वर्षीय कबीर बेदी चौथ्यांदा होणार बाबा!
2 विराटचा विवाह प्रस्ताव अनुष्काने फेटाळला?
3 देसी गर्ल प्रियांका चोप्राची ऑस्करमध्ये वर्णी!
Just Now!
X