News Flash

माझ्या मुलाची प्रकृती चांगली; शाळेतसुद्धा जातो! – इमरान हाश्मी

अभिनेता इमरान हाश्मीचा मुलगा आयान कॅन्सरने ग्रस्त असून, या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्यावर उपचार करण्यात आले. आपल्या मुलाची प्रकृती सुधारत असल्याचे इमरानने म्हटले आहे

| July 25, 2014 07:02 am

अभिनेता इमरान हाश्मीचा मुलगा आयान कॅन्सरने ग्रस्त असून, या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्यावर उपचार करण्यात आले. आपल्या मुलाची प्रकृती सुधारत असल्याचे इमरानने म्हटले आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात आयानवर पहिल्या श्रेणीतल्या कॅन्सरवरचे उपचार करण्यात आले. या चिमुकल्याला एका यशस्वी शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. आपल्या मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे एका वृत्तसंस्थेला सांगताना इमरान म्हणाला, माझ्या मुलाची प्रकृती चांगली असून, आता तो शाळेतदेखील जाऊ लागला आहे. ‘राजा नटवरलाल’ हा माझा आगामी चित्रपट त्याला दाखविण्याचे मी ठरवले आहे. हा चित्रपट त्याला आवडेल, अशी मला आशा आहे. ‘राजा नटवरलाल’ चित्रपटाला ‘यु/ए’ प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल इमरान आनंदी आहे. याविषयी बोलताना तो म्हणाला, ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे, त्यांनी हा चित्रपट कौटुंबिक असल्याचे म्हटले आहे. मला त्याचा अभिमान वाटतो. माझ्या मुलाने हा चित्रपट पाहावा, अशी माझी इच्छा आहे. तशाप्रकारचे (चुंबन दृष्य) दृष्य येताच मी त्याच्या डोळ्यांवर हात ठेऊन, त्याचे डोळे झाकून घेईन. पाकिस्तानी अभिनेत्री हुमैमा मलिक या चित्रपटात इमरानची नायिका आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2014 7:02 am

Web Title: emraan hashmi my son is doing fine goes to school
Next Stories
1 हनी सिंगकडून सोन्याच्या लॉकेटची भेट
2 लोकसत्ता LOL : …सलमान खानचे चाहते
3 सलमान खान आणि छोटा भीम पहिल्यांदाच एकत्र
Just Now!
X