दक्षिणेतली अभिनेत्री प्रिया आनंद म्हणते, ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटाने मला प्रचंड मान सन्मान आणि विश्वासार्हता मिळवून दिली आहे. ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटामध्ये श्रीदेवीला इंग्रजी शिकण्यासाठी मदत करणा-या राधाची भूमिका प्रियाने साकारली आहे.
“सहअभिनेत्री असून देखील या चित्रपटाने मला खूप ओळख मिळवून दिली. सहकलाकाराच्या जवळजवळ सर्वच पुरस्कारांसाठी माझ्या भूमिकेला नामांकण मिळाले. माझासाठी ही खूप मोठी उपलब्धी आहे”, असे प्रियाने सांगितले.
प्रिया आनंद हे नाव दक्षिणेतील सुप्रसिध्द नाव आहे. प्रियाच्या नावाचा तमिळ आणि तेलगु चित्रपटसृष्टी मध्ये बोलबाला आहे. फरहान अख्तर व रितेश सिध्दवाणी निर्मित आणि मृगदीप सिंग लांबा दिग्दर्शित ‘फुकरे’मधून प्रिया आनंद लवकरच आपल्या भेटीली येणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 12, 2013 7:11 am