छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’मधील स्पर्धक अर्शी खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. पण सध्या एका वेगळ्या कारणामुळे अर्शी चर्चेत आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक चाहता अर्शी खानसोबत सेल्फी काढण्यासाठी येतो आणि असे काही करतो की अर्शी आश्चर्यचकित होते.
बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अर्शी खानचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अर्शी विमानतळाच्या बाहेर उभी असल्याचे दिसत आहे. दरम्यान एक चाहता तेथे येतो आणि अर्शीसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. तो सेल्फी घेऊन झाल्यावर अर्शीचा हात पकडतो आणि किस करतो. ते पाहून अर्शी आश्चर्यचकित होते. व्हिडीओमधील तिचे एक्सप्रेशन पाहून ती घाबरली असल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
आणखी वाचा : ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री एकेकाळी पेट्रोल पंपावर करायची काम
चाहत्याचे वागणे पाहून अर्शी ‘चला चला आता इथून जा’ असे बोलताना दिसत आहे. सध्या अर्शीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चर्चेत आहे. अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने अर्शीच्या परवानगी शिवाय चाहत्याने असे करायला नको होते असे म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी अर्शी खान बिग बॉस १४मध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी तिची घरातील इतर स्पर्धकांसोबत भांडणे झाली होती. ती आणि राखी सावंत यांच्यामध्ये चांगले मैत्रीचे नाते पाहायला मिळाले.