News Flash

“१६ जुलै २०२१ रोजी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करा”, पंतप्रधान मोदींना पाठवलं पत्र

कृपया आमच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा असे या पत्रात म्हटले आहे

सुपरस्टार यशच्या ‘केजीएफ २’ची अनेकजण आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘केजीएफ चॅप्टर २’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यांनतर यशच्या चाहत्यांची उस्तुकता शिगेला पोहचली आहे. याचीच प्रचिती सध्या एका पत्रामधून दिसून येत आहे. तसं दाक्षिणात्य कलाकारांविषयी चाहत्यांचे असलेले प्रेम ते नेहमीच चर्चेचा विषय असतं. मात्र यावेळी यशच्या एका चाहत्याने चक्क पंतप्रधान मोदींकडे ‘केजीएफ चॅप्टर २’च्या प्रदर्शनादिवशी देशभरात राष्ट्रीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी केली आहे. यशच्या चाहत्याचे हे पत्र सोशल मिडीयावर व्हायरल होतं आहे. १६ जुलै २०२१ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 


“आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, स्टार यशचा ‘केजीएफ चॅप्टर २’ हा शुक्रवार १६ जुलै २०२१ ला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बरेच चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. म्हणूनच, आम्ही तुम्हाला विनंती करतो की या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करावी. कृपया आमच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. हा फक्त एक चित्रपट नाही तर आमची भावना आहे. धन्यवाद,” असे या पत्रात म्हटले आहे. या चाहत्याने आपली ओळख रॉकिंग स्टार यश बॉस चा एक चाहता अशी लिहिली आहे.

केजीएफ चॅप्टर २ हा कन्नड चित्रपट केजीएफचा सिक्वल आहे. यामध्ये सुपरस्टार यश हा मुख्य भूमिकेत आहे. केजीएफ चॅप्टर २ मध्ये यशच्या जोडीला बॉलीवूडचा खलनायक संजय दत्त आणि अभिनेत्री रविना टंडन ही पहायला मिळणार आहे. संजय दत्त हा ‘अधिरा’च्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या भागात अधिराची फक्त एक झलक दाखवण्यात आली होती. हा चित्रपट देशभरात पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 1:11 pm

Web Title: fans demand pm to declare kgf chapter 2 a national holiday abn 97
Next Stories
1 indian idol 12 : …म्हणून पद्मिनी कोल्हापुरेंनी सायलीला दिलं ‘हे’ मराठमोळं गिफ्ट
2 अजय देवगण तर चमचा; शेतकरी आंदोलनासंदर्भातील ट्वीटनंतर गायकाचा टोला
3 दया बेनची ‘तारक मेहता…’मध्ये एण्ट्री, केली शूटिंगला सुरुवात?
Just Now!
X