16 October 2018

News Flash

फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांचे चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण

गेली अनेक वर्षे फॅशन जगतात आपले नाव कोरणारा मराठमोळा फॅशन डिझायनर विक्रम फडणीस आता मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. ‘हृदयांतर’ असे त्याच्या पहिल्या मराठी

गेली अनेक वर्षे फॅशन जगतात आपले नाव कोरणारा मराठमोळा फॅशन डिझायनर विक्रम फडणीस आता मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. ‘हृदयांतर’ असे त्याच्या पहिल्या मराठी चित्रपटाचे नाव असून त्याचा मुहूर्त अभिनेता शाहरूख खानच्या हस्ते करण्यात आला. या वेळी हिंदी चित्रपट अभिनेता अर्जुन कपूरही या सोहळ्याला खास उपस्थित राहिला होता.

हिंदी चित्रपटांबरोबरच फॅशन डिझायनर म्हणून स्वत:च्या कलेक्शनने एक वेगळी ओळख निर्माण करणारा विक्रम ‘हृदयांतर’च्या निमित्ताने निर्माता आणि दिग्दर्शक अशा दोन भूमिकांमधून समोर येणार आहे. ‘कान्हा’ या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीचा श्रीगणेशा करणाऱ्या ‘यंग बेरी एंटरटेन्मेंट’ने ‘हृदयांतर’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत आहेत. एका दाम्पत्याच्या वैवाहिक आयुष्यात उठलेली वादळे आणि त्यांनी केलेला सामना याभोवती चित्रपटाचे कथानक गुंफण्यात आले आहे.

गेली अनेक वर्षे एक उत्तम चित्रपट बनवण्याचे स्वप्न विक्रम फडणीस यांनी उराशी बाळगले होते. या चित्रपटाच्या निमित्ताने ते स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल उचलले गेले असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. या चित्रपटाला मुहूर्ताचा क्लॅप बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खान याने दिला. तर अर्जुन कपूरनेही आपल्या मित्राच्या या नव्या कामासाठी त्याला शुभेच्छा दिल्या.

First Published on December 11, 2016 12:59 am

Web Title: fashion designer vikram phadnis debut in film direction