आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटामुळे प्रसिद्धझोतात आलेली अभिनेत्री फातिमा सना शेख हे नाव आता साऱ्यांनाच परिचयाचं झालं आहे. फातिमा सतत या ना त्या कारणाने चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असते. यावेळी देखील तसंच काहीसं झालं आहे. परंतु यावेळी तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

फातिमाने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमुळे तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. फातिमाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती ब्रेकफास्ट करताना दिसत आहे. विशेष म्हणजे रमजानचा महिना सुरु असताना तिने हा फोटो शेअर केल्यामुळे तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे.

फातिमाने शेअर केलेला फोटो फ्लोरिडा येथील आहे. सध्या ती फ्लोरिडामध्ये व्हेकेशन एन्जॉय करत असून तेथील प्रत्येक गोष्टीचा अपडेट ती चाहत्यांना देत आहे. त्यातच तिने ब्रेकफास्ट करतानाचा फोटो शेअर केला. मात्र तिचा हा फोटो चाहत्यांना फारसा आवडलेला दिसत नाही. हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

 

View this post on Instagram

 

Picnic. That’s not my food

A post shared by Fatima Sana Shaikh (@fatimasanashaikh) on

‘निदान रमजानच्या महिन्यात तरी असे फोटो शेअर करु नकोस’, असा सल्ला तिला एका चाहत्याने दिला आहे. तर ‘तू एक मुस्लीम असूनदेखील असं करतेस ? तुझ्या व्यतिरिक्त अन्यदेखील काही मुस्लीम बांधव आहेत निदान त्यांचा तरी मान राख’, असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

दरम्यान, ‘दंगल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री फातिमा सना शेख सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. काही दिवसापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटामध्ये ती झळकली होती. त्यानंतर आता लवकरच ती अनुराग बासूच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अभिनेता राजकुमार राव स्क्रीन शेअर करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.