News Flash

आमिर, आर माधवन पाठोपाठ ‘दंगल’ फेम फातिमा सना शेखला करोनाची लागण

तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली आहे.

सध्या छोट्या पडद्यावरील तसेच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना करोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. आमिर खान, आर माधवन, कार्तिक आर्यन, विक्रांत मेसी, परेश रावल यांच्या पोठापाठ आता ‘दंगल’ फेम अभिनेत्री फातिमा सना शेखला देखील करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. ती होम क्वारंटाइनमध्ये आहे.

फातिमाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला पोस्ट शेअर करत करोना झाल्याचे सांगितले आहे. ‘माझी करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे आणि सध्या मी होम क्वारंटाइन आहे. मी स्वत:ची योग्य ती काळजी घेत आहे’ असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी फातिमाचा ‘सूरज पे मंगल भारी’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. तसेच तिने नेटफ्लिक्स ओरिजनल मूव्ही ‘लूडो’मध्ये देखील काम केले आहे. या चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन, राजकुमार राव, सान्या मल्होत्रा, पंकज त्रिपाठी, रोहित सराफ हे कलाकार दिसले होते. फातिमा लवकरच अनिल कपूर यांच्यासोबत एका चित्रपटात दिसणार आहे. पण या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नाही. फातिमाने चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 5:46 pm

Web Title: fatima sana shaikh tests positive for covid 19 avb 95
Next Stories
1 अभिनेत्री स्पृहा जोशीवर सुके बोंबील भाजण्याची वेळ, ‘हे’ आहे कारण
2 “उपकार कर आणि शूटिंग बंद कर”, होळीच्या शुभेच्छा देणं अक्षय कुमारला महागात
3 प्रभासने खरेदी केली सहा कोटी रुपयांची नवी कार, पाहा व्हिडीओ
Just Now!
X