News Flash

फत्तेशिकस्त : बॉक्स ऑफिसवर मराठी वीरांची फत्ते

चित्रपटाची घसघशीत कमाई

फत्तेशिकस्त

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने घसघशीत कमाई केली आहे. सात दिवसांत ‘फत्तेशिकस्त’ने ५.६५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर मराठी वीरांची फत्ते झाल्याचं पाहायला मिळत आहे.

शिवाजी महाराजांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन घडविणाऱ्या भारतातील पहिल्या सर्जिकल स्ट्राइकचा थरार ‘फत्तेशिकस्त’मध्ये दाखविण्यात आला आहे. अवघ्या तीन दिवसांत ‘फत्तेशिकस्त’ने साडेतीन कोटी रुपयांची कमाई केली होती. त्या पुढील चार दिवसांत कमाईचा आकडा चांगलाच वाढला आहे. मुंबई, पुणे अशा काही शहरांत या चित्रपटाचे शो अजूनही हाऊसफुल होत आहे.

मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, मृण्मयी देशपांडे, अंकित मोहन, निखिल राऊत, हरीश दुधाडे, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, रुची सावर्ण, अश्विनी कुलकर्णी, नक्षत्रा मेढेकर, प्रसाद लिमये, अमोल हिंगे, ऋषी सक्सेना यांसोबतच हिंदीतला प्रसिद्ध चेहरा अनुप सोनी यांसारख्या मातब्बर कलाकारांनी ‘फत्तेशिकस्त’मध्ये भूमिका साकारल्या आहेत.

‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’नंतर आणखी तीन चित्रपट दिग्पाल लांजेकर प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. पाच चित्रपटांची ही मालिका आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 10:10 am

Web Title: fatteshikast box office collection chinmay mandlekar digpal lanjekar ssv 92
Next Stories
1 रणबीर-आलियाच्या लग्नाविषयी दीपिकानं केला खुलासा
2 सुभाष चंद्रा यांचा ZEEच्या चेअरमनपदाचा राजीनामा
3 डिलिव्हरी बॉयवर भडकली गायिका; तोकड्या कपड्यांच्या टि्वटवर सडेतोड उत्तर
Just Now!
X