‘शोरगुल’ या आगामी चित्रपटात बॉलीवूड अभिनेता जिम्मी शेरगिलने याने काम केल्याने त्याच्याविरोधात फतवा जारी करण्यात आला आहे. याशिवाय, या चित्रपटावर उत्तर प्रदेशमध्ये बंदी घालण्यात आल्याचीही माहिती चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिली आहे. चित्रपटाचे निर्माते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करून चित्रपटावरील बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शोरगुल हा चित्रपट देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारा असून, चित्रपटाच्या कथेला मुझफ्फरनगर येथे २०१३ साली घडलेल्या दंगलीचीही किनार आहे. चित्रपटात मुस्लीम धर्मीयांची भावना दुखावण्यात आल्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा खमान पीर बाबा समितीने केला असून, अभिनेता जिम्मी शेरगिलविरोधात निषेधाचा फतवाच जारी केला आहे.
चित्रपटात जिम्मी शेरगिलसोबत चित्रीत करण्यात आलेले काही सीन मुस्लीम धर्मीयांच्या भावना दुखावणाऱया असल्याचे या समितीचे म्हणणे आहे. जिमी शेरगलिची काही दृश्य मुस्लीम धर्मीयांमध्ये आपापसात तेढ निर्माण करणारी असल्याचेही समितीचे म्हणणे आहे.